हॅलो मी पोहोचले आहे रेसटॉरंट्स मध्ये तू कुठे आहेस? विशूने थोड्या दबक्या आवाजातच विचारले. पहिल्यांदाच असे कुणा मुलाला डेटिंग अँप मार्फत भेटायला आली होती त्यामुळे साहजिकच आहे की ती घाबरणार होती. अरे मी इकडे बसलोय मागे, इकडे बघ ये लगेच. त्याने सुद्धा मोठ्या उत्साहानं तिला जवळ बोलावले. महेंद्र आणि विशुची ही पहिलीच भेट होती. ह्या आधी ते महिनाभर डेटिंग अँपवर गप्पा मारत होते. अखेर त्यांनी एक दिवस भेटायचं प्लॅन केलं आणि तो दिवस आज उजाडला होता.
काय ग एवढी घाबरते कशाला, जस्ट चील, बस पाहू शांत म्हणून त्याने तिला थोड रागानेच म्हटलं. त्याचे हे असे वागणे विशुला आवडले नव्हते पण पहिल्यांदा समोर असे भेटतोय म्हणून तिनेही एवढं लक्ष दिलं नाही. दोघांचेही चाट वर ओळख होतीच म्हणून फक्त आज हाय हॅलो झाले आणि विशू गप्प बसली. वेटर इकडे ये रे (त्याने मोठ्या आवाजात त्याला आवाज दिला) दोन सँडविच आणि दोन कोक घेऊन ये, चल पटकन निघ आणि लगेच ये. त्याचे हे असे उद्धट बोलणे तिला अजिबात आवडले नव्हते आणि माझी सहमती न घेता आवड निवड न जाणता ऑर्डर करणे कितपत योग्य आहे हे तिला राहून राहून वाटत होतं.
मला सँडविच नको आहे महेंद्र i want only cold cofee. तिने ही थोड्या रागातच म्हटलं. त्याने सुद्धा ऑर्डर बदलून गप्पा मारायला सुरुवात केली. काय मग कसा वाटतोय मी समोर पाहून? खर खर सांग हा? विशू थोड्या विचारात हरवली ऑफिस मधील मैत्रिणींनो सल्ला दिला होता एकदा डेटिंग अँप वापरून बघ लग्नासाठी मुले मिळतील किंवा खरं प्रेम तरी होईल म्हणून तिनेही मोठ्या उत्साहात अँप मोबाईल मध्ये घेऊन लॉग इंन केलं. दुसऱ्याच दिवशी ह्या महायशयाची म्हणजेच महेंद्रची रिक्वेस्ट तिला आली.
त्याच्या बायोमध्ये जे काही लिहले होते त्यामुळेच विशूला त्याचा प्रोफाइल आवडला होता. त्याच्या बायो मध्ये ठळक अक्षरात लिहीले होते आवड वाचन, आवडत कांदबरी रेनॉल्ट शेल्फ. खरं सांगायचं झाले तर तिला वाचनाची आवड अगदी लहानपनापासूनच त्यात रेनॉल्ट शेल्फ ही कांदबरी वाचायला तशी अवघड, पण तरी सुद्धा त्याची आवडती कांदबरी रेनॉल्ट शेल्फ आहे हे पाहून थोड का होईना त्याच्याबाबत मनात फिलिंग निर्माण झाल्या होत्या. मग काय मेसेज आल्यानंतर ओळख झाली, सकाळी गुड मॉर्निंग पासून ते रात्री गुड नाईट पर्यंत गप्पा रंगू लागल्या.
तो कमी बोलायचं पण नेहमीच मनाला स्पर्श करेल असेच बोलायचा. त्याच्या ह्याच बोलण्यामुळे कदाचित तो तिला आवडू लागला होता. म्हणून त्याने जेव्हा तिला भेटीनासाठी विचारले तेव्हा ती नाही म्हणू शकली नाही. उद्या तो आपल्याला भेटणार म्हणून विशूने रेनॉल्ट शेल्फ कांदबरी आणून ती पूर्णपणे वाचून काढली. त्यातील पात्रांबद्दल समजून घेतलं होत जेणेकरून भेट झाली की त्या कांदबरी बद्दल तरी बोलता येईल.
O हॅलो मॅडम कुठे हरवला आहात तुम्ही, आम्ही काही विचारतोय, विशू विखुरलेल्या स्वप्नातून बाहेर आली. अरे हा खूप छान आहेस तू. पण डीपी मध्ये अजुन छान दिसत होतास आता एवढा दिसत नाहीस, ती मिश्किल हसली, एव्हाना महेंद्र च्या मनाला सुद्धा कळलं होत की ती त्याची टेर उडवत आहे. हो आता काय करणार फोटोला आम्ही फिल्टर लावून काहीही करू शकतो पण खऱ्या चेहऱ्याला काहीच करू शकत नाही. जे दिलेय देवाने ते घेऊन जायचं सोबत. आणि दोघेही हसू लागले.
महेंद्र ते रेनॉल्ट शेल्फ मधील अँड्रु नावाचे पात्र काय छान लिहिले आहे ना? अगदी मनातले आपल्या शब्दात मांडले आहे त्या पात्राणे असेच वाटतं. बरोबर ना? कशाबद्दल बोलतेस तू विशू? अरे रेनॉल्ट शेल्फ कांदबरी बद्दल बोलतेय मी. नाही ग मला नाही माहित मी वाचली नाही. अरे असे काय करतोय तुझ्या बायो मध्ये लिहिले आहे तुझी आवडती कांदबरी रेनॉल्ट शेल्फ आहे म्हणून. अरे हा खूप लोकांना ती आवडते म्हणून मग मी पण सहज लिहिले होते ते पण वाचली नाहीये मी. आता मात्र विशू ला खूप राग आला होता. पण तिने स्वतः चा राग शांत करून गप्प बसण्याचा निर्णय घेतला.
महेंद्रचा ड्रेसिंग सेन्स खूप खराब होता. जीन्स पँट आणि त्याच्यावर फॉर्मल शूज हा फॉर्म्युलाच तिच्या डोक्या बाहेर होता. न राहवून तिने त्याला विचारलं की ही कोणती फॅशन आहे सांगाल का साहेब? ही महेंद्र स्टाईल आहे कारण सर्वजण इतरांची स्टाईल कॉपी करतात मी स्वतः स्टाईल बनवतो आणि मग लोक माझी स्टाईल कॉपी करतात. थोड विचित्र आहे पण मी असाच आहे. खरतर विशूला हे सगळं विचित्र वाटत होत कारण चाट करणारा महेंद्र आणि समोर असलेला महेंद्र ह्यात खूप फरक होता.
तो महेंद्र अबोल, साधा आणि कमी बोलणार तर हा महेंद्र बिनधास्त बेधडक होता. त्या दोघांच्या गप्पा रंगत होत्या. तेव्हा त्याने मधेच एक प्रश्न केला की समजा आपले लग्न झाले आणि आयुष्यात एक दिवस अशी वेळ आली की तुला कुठे चांगले जॉब मिळाला आहे आणि मलाही चांगले जॉब मिळालं आहे तर ह्या दोन निर्णयांमधून अंतिम निर्णय मीच घेईल. कुठे जायचे आपण दोघांनी हे मीच ठरवेन.त्याच्या ह्या प्रश्नांनी आणि त्यांचे दिलेल्या उत्तराने खरं तर विशू अवस्थ झाली होती.
आजवर माझ्या आई बाबांनी कधीच कोणत्या माझ्या निर्णयावर बदल केला नाही किंवा कोणत्याच गोष्टीत जबरदस्ती केली नाही आणि हा महेंद्र असे कसे म्हणू शकतो? संसार दोघांचा असणार आहे मग निर्णय पण दोघांनी मिळूनच घेतला पाहिजे. तिने काहीच न बोलता मान खाली घातली. आजचा दिवस संपला पण विशू मात्र चिंतेत होती आता आयुष्यात पुढे काय करावं? महेंद्रला लग्नासाठी होकार द्यावा की नाही? त्याचे विचार वागणे पटण्या सारखे आहेत का नाही? तुम्हाला काय वाटतं मित्रानो महेंद्र बद्दल आम्हाला नक्की कळवा.
ह्या कथेत पुढे काय होणार आहे? ते दोघं एकत्र येतील का वेगळे होतील? तुम्हाला कथेचा दुसरा भाग हवा असे तरीही कमेंट करून सांगा.
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण)