मित्रांनो सध्याचा काळ हा घरात बसूनच आपण स्वतचं रक्षण करू शकतो आणि याच काळात चित्रपटाच्या शुट्टींग ही चालू झाल्या आहेत. या शुटींगच्या वेळी हे कलाकार लोक स्वतची आणि स्टाफची योग्य ती काळजी घेताना दिसत आहेत. मास्क आणि Sanitizer वापर येथे होताना दिसत आहे. याच काळात सध्या वारकऱ्यांची आषाढीची वारी ही सुद्धा राहून गेली आहे कारण परिस्थिती तशी आहे. पण तरीही आपल्याला देऊळ बंद हा सिनेमा बघून प्रत्यक्षात देवाचे दर्शन घडणार आहे.

देऊळ बंद ह्या सिनेमाचा पहिला भाग लोकांना खूप आवडला होता. यामध्ये असणारे मोहन जोशींच्या रूपातील स्वामी अजूनही लोकांना आठवतात. याचा दुसरा पार्ट काढण्यात आला आहे म्हणजेच देऊळ बंद २ ( आता परीक्षा देवाची) हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात विज्ञान आणि अध्यात्म या दोघांची सांगड घालण्यात आली होती. प्रवीण तरडे हे या सिनेमाचे लेखक आहेत. यांनी लॉक डाऊनचा काळ वाया ने घालवता या काळात या देऊळ बंद २ ( आता परीक्षा देवाची) सिनेमाचे लेखन केले आहे.
सध्या तरी या सिनेमात शेतकरी वर्गाच्या समस्या मांडल्या गेल्या आहेत. यात कोणते कलाकार असतील याची अजूनही तितकीशी माहिती मिळाली नाही आहे. गेल्या सिनेमात असणारे स्वामी आताही तेच असणारे की बदलणार हा मोठा प्रश्न प्रेक्षकांसमोर असणार आहे. कदाचित हा चित्रपट पुढल्या वर्षी म्हणजे २०२१ ला प्रदर्शित होणार आहे.
देऊळ बंद सिनेमाची कथा त्यातले संगीत सर्वांना मंत्रमुग्ध करणारे होते. पाहूया देऊळ बंद २ सिनेमात संगीत कसे असणे आहे. हे पण वाचा ह्या साउथ अभिनेत्रीने लॉक डाऊन मध्ये केलं वजन कमी