बॉलिवुड मध्ये सध्या अभिनेत्यांच्या मुलांची आणि मुलींची चलती आहे. त्यातील काही लोकांना आवडले ही पण काही तर काही काळाने दिसेनासे झाले. आताही एक असाच स्टार किड्स येत आहे तो कोणाचा मुलगा आहे हे तुम्हाला माहीत आहे का तर आपला बॉलिवुड व्हीलेन डॅनी डेन्जोंग्पाचा याचा मुलगा आहे. रिंजिंग डेन्जोंग्पा त्याचे नाव असून तो येत आहे बॉलिवुड मधील एका ऍक्शन, इमोशनल, थ्रीलर चित्रपटाने त्याची एंट्री होत आहे त्याचे नाव आहे स्क्वॉड’.
या चित्रपटामध्ये असे काही सीन आपल्याला पाहायला मिळणार आहेत जे आजपर्यंत बॉलिवुड चित्रपटांमधे कधीही पाहायला मिळालेले नाहीत. या चित्रपटात एक हेलिकॉप्टर चेजचा सीक्वेन्सही पाहायला मिळेल. या चित्रपटामध्ये रिंजिंगने सर्व सीन स्वतः दिले आहेत. त्यासाठी कोणत्याही बॉडी डबलची मदत त्याने घेतली नाही ही त्याच्यासाठी ही आणि आपल्यासाठी ही मोठी गोष्ट आहे.
अभिनेत्री अनीता राज हिची पुतणी मालविका राज ही या चित्रपटात आपल्याला अभिनेत्री म्हणून दिसणार आहे. याअगोदर ही तिने चित्रपटामध्ये काम केले आहे. ती लहान असताना ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात छोटी करीना म्हणून जी आपल्याला पाहायला मिळाली होती तीच ती मालविका राज होय, ती आता 26 वर्षाची झाली आहे. ती आपल्याला मॉडेलिंगच्या दुनियेत सक्रिय असलेली दिसते. आता बघुया लहानपणी असणारी ही मालविका प्रेक्षकांना आवडली होती पण आताचा तिचा अभिनय चाहत्यांना आवडतो का नाही.

डॅनी सध्या तरी आपल्याला चित्रपट सृष्टी मध्ये दिसत नाही पण तो दिग्दर्शक ही आहे त्याने आपल्या 40 वर्षाच्या कारकिर्दीत जवळजवळ 190 बॉलिवुड चित्रपट केले आहेत.