लहान मुलाच्या आवडीची तसेच मोठ्यांनाही भरपूर आवडणारे चॉकलेट म्हणजे डेरी मिल्क चॉकलेट म्हणून प्रसिद्ध आहे. तुमच्याही आले ना तोंडाला पाणी येणारच कारण तोंडात गेल्यावर आपोआप विरघळणारा हे चॉकलेट सगळ्यांचे मन मोहून टाकतो. याची गोड चव आणि वेगवेगळ्या फ्लेवर मधला हा चॉकलेट खाणे कोणालाही शक्य आहे कारण अगदी पाच रुपयांपासून मिळणारा हा चॉकलेट सगळ्यांच्याच खिशाला परवडणारा आहे. खर तर तुम्हाला बाजारात अनेक प्रकारचे चॉकलेट मिळतील पण डेरी मिल्क चॉकलेट सारखा कोणीच नाही. याच्या चविसोबत या चॉकलेट ची कथा ही खूप वेगळी आहे.
ही कथा सुरू होते एका जॉन कॅटबरी नावाच्या मुळापासून याचा जन्म जवळ जवळ 216 वर्षांपूर्वी ब्रिटन मधील बर्मिंगम येथे झाला होता. आपले शिक्षण झाल्यावर एका कॉफी शॉप मध्ये कामाला लागला पुढे जाऊन 1824 मध्ये त्याने आपले स्वतःचे दुकान सुरू केले. जिथे तो कॉफी, चहा, आणि चॉकलेट ड्रिंक विकायचा पुढे काही वेळ गेल्यानंतर त्याला कळले की चहा आणि कॉफी पेक्षा त्यांची चॉकलेट ड्रिंक लोकांना जास्त आवडते. त्यानंतर त्यांनी चहा आणि कॉफी बंद करून फक्त चॉकलेट ड्रिंक वर आपले लक्ष केंद्रित केले शिवाय चॉकलेट चे आणखी पदार्थ विकायला त्याने सुरुवात केली. त्यानंतर स्वतच्या भावाला सोबत घेऊन त्यांनी एक मोठी कंपनी उभारली. चॉकलेट ची कॉलेटी नेहमीच उत्कृष्ट असल्याने त्यांना रॉयल वॉरंटी सर्टिफिकेट मिळाले.
पुढे जाऊन कॅडबरी खूप प्रसिद्ध होत गेली त्यानंतर दोन्ही भावांच्या मध्ये भांडणे झाल्यामुळे कंपनीचे दोन भाग झाले. त्यानंतर जॉनचे वय होत गेल्यामुळे कंपनीची जबाबदारी आपल्या दोन मुलांवर रिचर्ड आणि जॉर्ज यांच्यावर टाकली. त्यानंतर या दोघांनी आपले चॉकलेट देशाच्या बाहेर ही पाठवण्याचे ठरवले त्यानंतर काही वर्षांनी जॉन याचे देहांत झाले आणि त्यानंतर रिचर्ड ही हे जग सोडून गेला त्यानंतर जॉर्ज ने आपल्या चॉकलेट मध्ये आणखी बदल केले आणि त्यातून डेरी मिल्क चॉकलेट ची निर्मिती झाली. त्यांनी दूध, चॉकलेट पावडर आणि साखर यांचे मिश्रण केले याची चव खूप छान होती. त्यानंतर हेच मिश्रण ड्राय केले तेव्हा याची चव अधिकच उत्कृष्ट होती.
या प्रक्रियेनंतर कॅडबरी चे डेरी मिल्क चॉकलेट मध्ये रूपांतर झाले. 1948 चे डेरी मिल्क भारतात आगमन झाले इथेही चांगली कॉलेटी आणि चव यामुळे डेरी मिल्क लोकांना खूप अावडू लागली. संपूर्ण जगात 50 पेक्षाही जास्त देशात डेरी मिल्क चॉकलेट प्रसिद्ध आहे. तर बघा मित्रानो आज एक अशा मुलाची कथा जो ना चागल्या शाळेत शिकला नाही त्याला नोकरी करता आली पण आज त्याचे चॉकलेट जगप्रसिद्ध आहे यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते.