तुम्ही सुद्धा तुमच्या नवऱ्याला आणि मुलांना डब्यामध्ये जेवण देताना त्याला अल्युमिनियम फॉईल ने गुंडाळता का ? तसे करत असाल तर वाचा हा लेख. अल्युमिनियम फॉईल मध्ये अन्न गुंडाळले जाते त्यामुळे अन्न गरम आणि ताजे राहते हा गैरसमज खूप लोकांच्या मनात आहे पण हा समज चुकीचा आहे. काहीजण तर चक्क अन्न शिजवताना ही या अल्युमिनियम फॉईलचा सर्रास वापर करताना दिसतात. पण हे वापरताना त्याच्या होणाऱ्या नुकसान बद्दल तुम्हाला माहीत आहे का ? आपण यात आपले बनवलेले अन्न बांधतो त्यामुळे दोघांमध्ये एक प्रकारची रिएक्षण होत असते.

यामुळे आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो. आपण जेव्हा अल्युमिनियम फॉईल मध्ये गरम गरम जेवण बांधतो तेव्हा अल्युमिनियम फॉईल गरम झाल्यावर ऑक्सीकरण होऊन ते आपल्या अन्नामध्ये विरघळते आणि यापुढे जाऊन ते अल्जाइमर,ऑस्टियोपोरोसिस, किडनी चे रोग, कॅन्सर आणि हाडांशी संबधित रोग होतात. यासाठी काय करावे तर लगेच गॅस वरून उतरवलेले गरम गरम जेवण यात बंद करू नका.
जर तुम्हाला वापर करायचा झाल्यास चांगल्या प्रकारचां एल्युमिनियम फॉयल पेपरचा वापर करू शकता. शिवाय ज्या पदार्थामध्ये आंबटपणा असतो ते पदार्थ या पेपर मध्ये ठेवणे कधीही टाळावे. आणखी थोड महत्वाचं म्हणजे वृत्तपत्राच्या पेपरमध्ये खाद्यपदार्थ गुंडाळलेले असल्यास आरोग्यासाठी हे घातक ठरू शकते. कारण, या पेपरची शाई अन्नपदार्थाला लागल्यानं व्यक्तीची तब्येत बिघडू शकते.