सध्या लॉक डाऊनच्या काळात सर्वांनी घरातच थांबा असा आदेश सरकारने दिला आहे आणि हा आदेश पाळणे हे आपले कर्तव्य आहे. तसेच हा आदेश आपल्या चांगल्यासाठीच आहे, पण हे आदेश न मानणारे बरेच लोक या राज्यात ही आहेत. त्यामुळे संक्रमण ची संख्या कमी होण्या ऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
सरकारने आदेश दिले आहेत जे लोक आहेत त्याच ठिकाणी रहा. अन्न सरकार पुरवेल पण काही ठिकाणी हा आदेश पाळला जात नाही. वांद्रे स्टेशन समोर मंगळवारी परपंतियांची प्रचंड गर्दी उसळली होती. यांचे म्हणणे होते की आम्हाला आमच्या गावी जायचे आहे, पण काही तासांनी पोलिसांनी हा जमाव हटवला. जमाव हटला तरी आपल्या राज्यात राजकारण हे असे मध्यम आहे की त्याच्यातून माणूस काहीही साध्य करू शकतो.
या गर्दीचा फायदा घेऊन भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर सरकारवर जोरदार टीका केली आणि राजीनामा देण्याची मागणी केली होती. पण त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांवर ही राजकारण करण्याची वेळ नाही असा शब्दात उत्तर दिले. मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनीही ट्विट केले आणि ज्या लोकांनी राजीनामा मागितला आहे त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
त्यांनी ही उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी आम्ही आहोत असे सांगितले आणि राज ठाकरे ही त्यांच्या पाठीशी आहेत. सरकार या काळात जे चांगले काम करत आहेत त्यांच्या सोबत सगळ्यांनीच उभे राहायला हवे. शिवाय संकट काळात हे दोन भाऊ जे एकत्र आले आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होतो ती गोष्ट सध्या आपल्याला दिसत आहे.