शिंपल्या मांसाहार मध्ये मोडतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण जसा माशांना खाण्याचा मोह लोकांना आवरत नाही. शिम्पल्या मात्र कमी प्रमाणत लोक खातात तसे पाहायला गेले तर माशाप्रमाणे बाजारात या सुधा पाहिजे तशा विकायला येत नाही. पाहायला गेलात तर कॅल्शिअमचा सर्वात मोठा स्त्रोत म्हणजे शिंपले होय. म्हणून जात तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर शिंपले खा. तसेही माणसाचे वय वाढत जाते तसे कॅल्शियम ची कमतरता जाणवत राहते. त्यामुळे शिंपले खाल्यास उत्तम.
शिंपले खाण्याचे फायदे
वाळू मध्ये लपून बसलेले हे शिंपले पाहिले तर खूप वाळू आणि माती चिकटून घाण झालेली असतात. त्यामुळे शिजवण्याच्या अगोदर साफ दोन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवावे. नंतर त्या एक एक काढून त्यातील मांस काढून घ्यावे. जमत नसेल तर सरळ टोपात पाणी घेऊन त्यात उकडत ठेवा. मग त्या हळू हळू सुटतात. हे शिंपले कांदा लसूण आले, लाल मसाला थोडा गरम मसाला वापरून रसा करा किंवा सुकीच वाफवा खायला छान लागते. तुम्हाला हवे तसे बनवू शकता आणि भाकरी किंवा भाता सोबत मस्त ताव मारा.
शिंपले खायला जसे चवदार आणि आपल्या शरीर साठी हेल्दी आहेत. त्याचप्रमाणे काही लोकं यांचा शो पीस म्हणून व्यवसाय ही करतात. हे शिंपले स्वच्छ धुवून घासून त्यांना रंगरंगोटी केली जाते. अनेक प्रकारच्या साधनांनी सजऊन याचे शो पीस छान दिसतात. त्याचप्रमाणे पडदे तोरण ही बनवले जातात यामुळे दाराची शोभा वाढते.
तुमची कंबर दुखत असेल किंवा हाडे कॅल्शियमच्या कमतरता मुळे ठिसूळ झाली असतील तर नक्की हे तीसऱ्यांचे कालवण किंवा शिंपले खा. बाहेरचे केमिकल युक्त कॅल्शियम तुम्हाला सहज उपलब्ध होईल पण हे नैसर्गिक कॅल्शियम तुमची हाडे ही मजबूत करतील आणि तुमचे स्वस्थ ही चांगले राहील.
पावसाळ्यात उगवणाऱ्या या रानभाज्या कधी खाल्ल्या आहेत का तुम्ही? असतात खूप गुणकारी