बऱ्याच दिवसापासून मी एक गोष्ट प्रामुख्याने नोटीस केली आहे की आमच्या बाजूच्या फ्लॅटमध्ये भांडणाचे आवाज जोरजोरात येत होते. मी आईला विचारले सुद्धा आई एकदा जाऊन बघ पण आई म्हणाली नवरा बायकोच्या भांडणात आपण न पडलेले बरं. सुजय आणि सारिका मागील आठ महिन्यांपासून आमच्या सोसायटी मध्ये राहायला आले होते. दोघेही छान जोडपं वाटत होते. पण म्हणतात ना नेहमी दिसतं तसं काहीच नसतं सारिका माझ्या वयापेक्षा आठ ते नऊ वर्षांनी मोठी असेल पण तिच्याकडे बघून कधीच मला असे वाटत नव्हत की ती माझ्यापेक्षा मोठी आहे.
ती नेहमी आमच्याच वयोगटातील वाटायची. पण सुजय कामावर गेल्यावर अनेक मुलांचे त्यांच्या घरी येणे जाणे असायचे त्यामुळे आमच्या सोसायटीमध्ये सारिकाचे नाव खराब झाले होते. लोक नको नको ते बोलत होते. आईने तर मला सख्त ताकीद दिली होती. अजिबात त्या सटवीशी बोलायचं नाही. एका अनोळखी मुला सोबत सुजयने सारिकाला त्यांच्याच घरात रंगेहाथ पकडलं. त्यामुळे त्यांची भांडणे रोज चालूच होती.
सारिकाचे स्पष्ट मत होते की तू माझ्या सर्वच गरजा भागवता नाहीस. पैशांची नेहमीच तुझ्याकडे कमतरता असते. अशातच तू फाटक्या खिशाचा आहेस. समाजात माझ्या आणि तुझ्या घरची इज्जत जायला नकोय म्हणून मी तुझ्या सोबत दिवस ढकलत आहे. उगाच माझ्या वयक्तिक आयुष्यात पडू नकोस नाहीतर तुझ्यावर पोलीस केस करेल तू मला शारीरिक त्रास देतोय म्हणून. शेवटी सुजय सुद्धा हे सर्व ऐकुन गप्प बसायचं. त्याच्या हातात पण दुसरा कोणताच पर्याय शिल्लक नव्हता.
सारिका नेहमीच येता जाता माझ्याकडे बघायची. मला कसेतरी वाटायचं कारण तिची नजरच कुणालाही भुरळ पाडेल अशीच असायची. पण आज तर हद्द पार झाली. मी घरात जात असताना सरिकाने संधी बघून माझा हाथ ओढला आणि तिच्या घरात मला ओढून घेतलं. काय करताय तुम्ही हे वेड लागले आहे का तुम्हाला? मी रागातच त्यांच्या अंगावर गेलो. अरे महेंद्र एक मुलगी घरात कुणी नसताना तुला ओढून आणते ह्याचा अर्थ तुला समजायला हवा. लहान नाही आहेस तू आता.
ह्याचा अर्थ मला कळतोय म्हणून तर भडकतो आहे. तुमच्यावर जरी चांगले संस्कार झाले नसतील तरी माझ्या घरच्यांनी माझ्यावर चांगले संस्कार केले आहेत. मला हे अजिबात आवडत नाहीये. सारीकाने मला खूप आडवण्याचा प्रयत्न केला पण मी तिथून निघून आलो. आता जेव्हा पण मी तिला कधी एकटा दिसतो तेव्हा ती इशाऱ्याने मला बोलवत राहते. पण माझ्या मनाला माहीत आहे मी असे काही चुकीचं कधीच वागणार नाही.
माझ्या ह्या परिस्थितीला अनुसरून सध्या एक शेर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. बुलाती हैं मगर जाने का नहीं. हे ऐकले की मी अजुन मनाला सावरतोय.
मी लिहलेल्या ह्या कथा पण वाचा
समाप्त
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण)