काल किंवा आज तुम्हाला एक बातमी तुमच्या व्हॉटसअप किंवा इतर ठिकाणी वाचायला नक्की मिळाली असेल. जर तुम्ही ट्विटरवर सक्रिय असाल तर तुम्ही एक गोष्ट आज नक्कीच नोटीस केली असेल ती म्हणजे #Budweiser हा हॅश टॅग ट्रेण्ड करत आहे. तर बातमी अशी आहे की बडवाइजर कंपनी मधील एक कर्मचारी वर्षानुवर्ष बियरच्या टँक मध्ये मुत्रविसर्जन करत होता. त्यामुळे ही बातमी सध्या जोरात वायरल होत आहे. Budweiser पिणाऱ्या मित्रांना अनेक मित्र ही बातमी शेअर करत आहेत.
एका ऑनलाईन वेबसाईट नी ही बातमी प्रसिद्ध केली की हा कर्मचारी गेली १२ वर्ष ह्या बीयर टँक मध्ये मुत्र विसर्जन करत आहे ही बातमी खोटी आहे. तिथे काम करणाऱ्या वाल्टर पॉवेल ह्या कर्मचाऱ्यांनी ही माहिती दिली आहे की आमच्या कंपनी मध्ये ७५० कर्मचारी काम करत आहेत. आणि आम्ही सर्व कर्मचाऱ्यांवर योग्य अशी नजर ठेवतो. त्यामुळे असे काही होणे शक्य नाही. कुणीतरी जाणीवपूर्वक ही अफवा पसरवली आहे.
चहा प्या तो ही फक्त कोरा आणि रहा हेल्दी बघा कोणकोणते फायदे मिळतात.

सध्या ही बातमी सोशल मीडियावर आगी सारखी पसरत आहे. अनेक नेटकरी ह्याचे में म्स बनवून शेअर करत आहे. पण ही एक अफवा आहे त्यामुळे मद्यप्रेमी नी ह्याकडे लक्ष देऊ नये.