Home करमणूक बॉलिवुड स्टार लग्नात लिफाफा मध्ये देतात इतके पैसे जाणून तुम्ही ही थक्क व्हाल

बॉलिवुड स्टार लग्नात लिफाफा मध्ये देतात इतके पैसे जाणून तुम्ही ही थक्क व्हाल

by Patiljee
460 views

तर तुम्हाला आम्हाला माहितच आहे की आपण जेव्हा एखाद्याच्या लग्नाला जातो त्या व्यक्तीच्या गुणांवर, पैशांवर आणि त्याने आपल्याला लग्नात किती आहेर टाकला आहे यावर आपण त्या व्यक्तीला टाकण्यात येणारा आहेर ठरवत असतो. पण तुम्ही या गोष्टीचा विचार केला आहे का की सिनेमा जगतात लोक जेव्हा एकमेकांच्या लग्नात जातात तेव्हा जो लिफाफा लग्न होणाऱ्या व्यक्तीला देतात त्यात नक्की किती रक्कम असेल याची उत्सुकता तुम्हाला ही असेल ना मग जाणून घेऊ या यामागील एक सत्य ज्यामुळे तुम्हाला तुमचं उत्तर नक्की मिळेल. 

बॉलिवुड सितारे खूप जास्त पैसे कमावत असतात त्यामुळे ते लोक लग्नामध्ये खूप जास्त खर्च ही करतात पण खरंच ही गोष्ट महत्त्वाची आहे का जितके आपण लग्नात खर्च करतो तितके पैसे आपल्याला लग्नाच्या लिफाफा मधून मिळायला हवेत. तर ते मुळातच नाही. तर सिनेमा जगतातील जे सितारे आहेत ते एकमेकांच्या ते लग्नात लिफाफा देतात त्यामध्ये फक्त  101 रुपये असतात तर ही खरंच आहे ही गोष्ट कारण या गोष्टीचा खुलासा अमिताभ बच्चन यांनी केला आहे. ते एका शो मध्ये गेले होते त्या शो चे नाव आहे कपिल शर्मा शो.

तर या शो मध्ये कपिल शर्मा ने अमिताभ बच्चन जी ना एक प्रश्न विचारला की सिनेमा जगतातील सितारे जेव्हा लग्नाला जातात तेव्हा लिफाफा मध्ये किती रक्कम भरतात. त्यावर अमिताभ यांनी उत्तर दिले की, आम्ही शगुन म्हणून 101 रुपया पाकिटात भरून देतो. आता तुम्हाला प्रश्न पडेल की करोड रुपये कमावणारे सितारे लग्नात पाकिटात फक्त 101 रुपये देतात हे कसे शक्य आहे. तर लग्नात पाकीट मध्ये किती रक्कम भरायची ही सगल्यांपुढे एक मोठी समस्या असायची.

जास्त करून ज्युनिअर आर्टिस्ट आणि कॅमेरामन सारखे लोक मोठमोठ्या सितारे आणि डायरेक्टर यांच्या पार्टी मध्ये जाण्यासाठी लाजायचे. तर अशाच समस्येला अनुसरून याच सिनेमा जगतातील लोकांनी एक शगुन याच्या स्वरूपात 101 रुपये देण्याचे ठरविले. त्यामुळेच आता प्रत्येक दर्जाचा व्यक्ती हा त्या इंडस्ट्रीमध्ये असलेल्या लग्नकार्यात सहभागी होत असतो.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल