काळानुसार जरी माणूस बदलत चालला असला तरी अशा काही आठवणी आहेत ज्या कधी बदलता येणार नाही. ह्या आहेत बॉलिवुड मधील खतरनाक अशा खलनायिका यांचे बॉलिवुड सिनेमातील काम बघता हातात मिळेल ती वस्तू टीव्ही वर फेकून माराविशी वाटायची. पण टीव्ही फुटायचा या चिंतेने पुन्हा मन उदास व्हायचे. पण खरं तर यांच्या या भूमिका प्रेक्षकांच्या मनात उतरायच्या आणि त्यांबद्दल प्रेक्षकांची ही रिअँक्शन आल्यावर खरोखर त्यांच्या या कामाचं कौतुक करावं तितकं थोड आहे. म्हणून आज आपण अशाच बॉलिवुड मधील खलनायिका बघणार आहोत ज्यांना बघून तुम्हालाही कधी तरी राग आला असेल.
ललिता पवार
त्या वेळी ही खलनायिका इतकं परफेक्ट खलनायिकाचा रोल करायची की तिचे डायलॉग आणि तिची बोलण्याची वेगळीच लकब त्यावेळी लोकांना खूप आवडली होती. ललिता पवार यांच्या आयुष्यात तेव्हा वेगळेपण आले जेव्हा शुट्टींगच्या वेळी भगवान दादा यांनी जोरात ललिता पवार यांच्या कानाखाली लावली होती. त्यावेळी त्याच्या डोळ्याची नस खराब होऊन त्याचा परिणाम डोळ्यांवर झाला होता. पण त्यामुळे कधीच त्यांच्या रोजच्या कामावर प्रभाव पडला नाही. त्यांची मंथरेची भूमिका तर अजूनही आपल्या लक्षात असेलच. शिवाय 700 हून अधिक चित्रपट या अभिनेत्रीने दिले आहेत. अशा प्रकारे कुजकट आणि खतरनाक सासूची भूमिका करणाऱ्या या ललिता पवार अजूनही आपल्या आठवणीत आहेत.
नादिरा
आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये या अभिनेत्रीने चित्रपटात जरी अभिनेत्रीची भूमिका केली असली तरी तिला लोकांनी एक खलनायिका म्हणूनच जास्त पसंत केली आहे. तीच राहणीमान ही त्या काळी वेगळं होतं म्हणजे अगदी मॉडर्न लुक हीच तिची त्यावेळी ओळख होती. नादिरा यांनी ही बॉलिवुड मध्ये अनेक सिनेमे केले पण ज्युली या सिनेमात ज्युलीची आई लोकांच्या खूप पसंतीस आली होती.
बिंदू
बिंदू ही जरी खलनायिका म्हणून काम करत असली तरी त्यावेळी तू दिसायला खूप सुंदर आकर्षक होती. शिवाय खलनायकाच्या प्रेमिकाचा रोल करताना ती एक उत्तम नर्तिका होती हे ही तिने आपल्या डान्स मधून अनेकदा दाखवले आहे. तिचा जन्म एका गुजराती परिवारात झाला होता आणि तिचे वडील हे फिल्म निर्माता होते. पण बिंदू 13 वर्षाची असताना ते हे जग सोडून गेले. त्यानंतर घराची सर्व जबाबदारी बिंदू मोठी असल्यामुळे तिच्यावर आली. बिंदू हिने चित्रपटात कितीतरी वेगवेगळे असे कॅरेक्टर केले पण एक खलनायिका म्हणूनच ती लोकांच्या पसंतीस उतरली होती.
अरुणा इराणी
दिसायला सुंदर अशी अभिनेत्री अरुणा इराणी ही अजूनही लोकांच्या मनात कुठेतरी आपल्याला दिसून येते. त्यावेळी तिने केलेली खलनायिका म्हणून भूमिका खूप लोकांना आवडायची. पहिल्यांदा तिने लीड रोल मधून बॉलिवुड मध्ये प्रवेश केला पण प्रेक्षकांनी तिला एक खलनायिका म्हणूनच पसंत केले. हिचे शिक्षण त्यावेळी फक्त सहावी पर्यंत झाले होते पण त्यासाठी त्यांच्या घराची गरिबी कारणीभुत होती. पण तिच्यातील कला आणि आत्मविश्वास तिला पुढे जाण्यास नाही थांबाऊ शकले.
शशिकला
शशिकला यांच्यामध्ये लहानपणापासून खूप टैलेंट होता होता. वयाच्या 5 व्या वर्षा पासून तिने डान्स , गाणे हे स्टेज वर करत होती. तरुणाईत आल्यावर सिनेमामध्ये काम करण्या अगोदर तिला खूप धक्के खावे लागले पण तिच्यात असणारा आत्मविश्र्वास तिला थांबू शकला नाही. सुरुवातीला तिला छोटे रोल मिळत गेले. त्यानंतर नुरजहा यांच्या भेटीनंतर शशिकला यांचे नशीब पालटले. नुरजहा यांच्या पतीने त्यांच्या सिनेमात एक महत्वाचा रोल दिला आणि त्यानंतर शशिकला यांचे नशीब बदलून गेले.
हेलन
पिया तू अब तो आजा या गाण्यामध्ये डान्स करणारी हेलन ही आपल्या अजूनही डोळ्यासमोरून गेली नाही त्यावेळी हेलन चां डान्स इतका लोकांना आवडायचा की हेलनचा डान्स पाहण्यासाठी लोक चित्रपट पाहायला जायचे. अगदी हॉट आणि सुंदर दिसणाऱ्या या अभिनेत्रीने लोकांच्या मनावर आपला ताबा मिळवला होता त्या वेळी दिसायला इतकी सुंदर असूनही तिला लोकांनी एका खलनायिका हिच्या रूपातच पसंती दिली. तिने 700 पेक्षा जास्त चित्रपट केले आहेत.