Home संग्रह अबब इथे दर वर्षी हजारो पक्षी एकत्र येऊन आत्महत्या करतात…!!

अबब इथे दर वर्षी हजारो पक्षी एकत्र येऊन आत्महत्या करतात…!!

by Patiljee
1006 views

पृथ्वीवर अनके प्रकारचे जीव आढळतात, प्रत्येकाला निसर्गाने भरभरून दिले आहे, निसर्गाच्या अनेक चमत्कारिक गोष्टींचा आजही उलगडा झालेला नाही. कितीतरी गोष्टी आजही निरुत्तरीतच आहेत. अशाच काही अनाकलनीय गोष्टी विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. काय होईल जेव्हा हजारो पक्षी एकत्र येऊन आत्महत्या करतील. स्वतःच तरफडून तरफडून आपल्या डोळ्यासमोर मरत असतील तर काय होईल. मनुष्य जन्मात आत्महत्या हे पाप मानले जाते. अनैसर्गिक पद्धतीने जीवन संपणे म्हणजे तो अतृप्त जीव एक निगेटिव्ह शक्ती बनून राहतो, असा समज सर्वश्रुत आहे. मात्र हजारो पक्षांची आत्महत्या कधी ऐकली आहे का , हजारो पक्ष्यांची आत्महत्या हो हजारो पक्षी एकावेळी इथे आत्महत्या करतात.

आसाममध्ये एक गाव आहे जिथे  दरवर्षी पावसाअखेरीस ४४ हुन अधिक जातीचे पक्षी हजारोंच्या संख्येने आत्महत्या करतात. नवल तर या गोष्टीचे वाटते की याचे कारणही कळत नाही. तब्बल ११४ वर्षांपासून ही आश्चर्यकारक घटना आजतागायत प्रत्येक वर्षी घडत आली आहे. दर वर्षी हजारोंच्या संख्येने मृत्युमुखी पडणारे अनेक पक्षी पाहताना हृदय पिळवटून जाते. आसाम मध्ये एक गाव आहे तिथे अंदाजे २,५०० आदिवासी लोकसंख्या असणारे जटिंग हे आसाममधील एक छोटेसे गाव आहे. निसर्गाने सुंदर अशी वनराईची देणगी दिलेली आहे मात्र या पक्षांच्या होणाऱ्या ऱ्हासाने देवाच्या क्रोधाला बळी पडले आहेत की काय असे वाटते. गावकरी याला शाप नाही तर वरदान मानतात कारण पक्षी मेल्यावर त्यांना ते खायला मिळतात. खूपच सुंदर असलेलं हे गाव निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या ह्या गावाच्या आजूबाजूला पसरलेली घनदाट जंगले आणि डोंगरदऱ्या हे नानाविध स्थानिक तसेच स्थलांतरित पक्ष्यांचे आश्रयस्थान आहे. अनेक प्रकारच्या जाती इथे येतात.

सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यांमध्ये पावसाळा संपत आलेला असतो. अमावस्येच्या दरम्यान जेव्हा गर्द अंधार असतो, तसेच हवेमध्ये आद्रता पसरलेली असते तेव्हा संध्याकाळी ७ ते रात्री १० ह्या वेळेमध्ये अनेक पक्षी विचित्रपणे वागायला लागतात. त्या अंधारामुळे की कशामुळे हे मात्र माहीत नाही. ते प्रकाशाकडे आकर्षित होतात, मग दूरवर पेटलेली आग दिसली तरी ते धावतच तिथे जाऊन त्या आगीत झेप घेतात. दूरवर वेगात उडताना वाटेत येणारी झाडं झुडपं यांना न जुमानता ते उडत राहतात यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात दुखापत होत असते. अनेक पक्षांचा यात मृत्यू होतो. जटिंग गावाला लागून १.५ किलोमीटर पसरलेला एक भाग आहे तिथे अनेक जातीचे पक्षी जमा होतात.  एकत्र येऊन घिरट्या घालायला सुरवात करतात,  आकाशातून जमिनीच्या दिशेने अचानकपणे झेप घेऊ लागतात. विचित्र पणे स्वतःला इजा पोहचविण्याचा प्रयत्न करत असतात.

कुठल्याही प्रकारचा प्रकाश दिसला जसे की रस्त्याबाजूचे दिवे, घराच्या लाईट्स, मशाली वैगेरे तर त्यावर मागचा पुढचा विचार न करता पूर्ण वेगाने येऊन धडकतात. त्यात त्यांचे पंख जळतात, आणि अशाच प्रकारे ते मारूनही जातात. ह्यामध्ये अनेक पक्षी जखमी होतात. काही पक्ष्यांचा जागीच मृत्यू होतो. काही जखमी होऊन जमीनीवर तडफडत राहतात. तर काही पक्षी गावकरी घरी घेऊन जातात. काही बरे होतात तर काही मरण पावतात, जरी ते जगले तरी त्याच्या पुढच्या वर्षी पुन्हा त्याच भयानक परीक्षेतून त्यांना जावे लागते, मोठ्या नाशिबाने ते जगले तर जगले. पक्ष्यांच्या अश्या ह्या भयानक आत्महत्येच्या प्रकाराबद्दल गावकऱ्यांना सर्वप्रथम १९०५ साली समजले. तेव्हा ती प्रकार एकदमच नवीन होता, भुताटकीचा वाटणारा प्रकार इथे आहे असा या लोकांचा समज झाला होता. त्या गावात एकदा एक गोष्ट घडली ज्यामुळे ही पक्षांच्या आत्महत्या होतात ही घटना समोर आली.

एकदा  गावातील एका माणसाचा बैल हरवला होता आणि त्याला शोधता शोधता काही गावकरी ह्या भागामध्ये पोचले. तेव्हा त्यांना ही गोष्ट लक्षात आली करणं ते जिथे होते तिथे अचानकपणे त्यांच्या हातात असणाऱ्या मशालींवर पक्ष्यांनी जोरदार हल्ला चढविला. आगीशी ते गमती गमतीत खेळत असल्या सारख दिसत होतं, अनेक पक्ष्यांचा त्यात मृत्यू झाला. त्यानंतर ही क्रिया नित्यनेमाने सुरू आहे. गावकऱ्यांचा असा समज आहे की हे पक्षी म्हणजे वाईट आत्मे असतात आणि त्यांना देव शिक्षा देत असतो. त्या अमावस्येला त्यांच्या अंगात अशीच काही भुताटकी जन्म घेते त्यामुळे पक्षी असे वागायला सुरवात करतात.

तसेच गावातील लोकांवर देवाची कृपा आहे म्हणून देव त्यांना हे पक्षी खाद्य म्हणून उपलब्ध करून देतो असेही लोक मानतात, पक्षी मेल्यावर ही लोक त्या ताज्या मरण पावलेल्या पक्ष्यांना घरी घेऊन खातात, त्या पक्षांना देवाने दिलेला आशीर्वाद मानतात.

दरवर्षी गावकरी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांमध्ये ह्या ठिकाणी प्रकाशाची सोय करून सापळे लावून ठेवतात ज्यात शेकडो पक्षी क्रूरपणे मारले जातात. मागच्या काही वर्षांपासून पक्ष्यांची संख्या थोडी कमी झाली आहे. तरीही दर वर्षी हे घटनासत्र चालूच असते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून ह्या घटनेकडे कसे बघितले जाऊ शकते तर ,  कादाचीत त्या वेळच्या वातावरणात होणारे बदल, गर्द अंधार यामुळे हे पक्षी असे वागत असू शकतात. का खरंच यांमध्ये काही शक्ती संचारत असावी ,याबद्दल काही खास अशी माहिती उपलब्ध नाही.

जटिंग गावात होणाऱ्या पक्ष्यांच्या आत्महत्येबाबत अनेक पक्षीनिरीक्षकांनी आणि शास्त्रज्ञांनी संशोधन करण्याचा प्रयत्न केला. कारण पक्षांची कमी होणारी संख्या यामुळे ते दुर्मिळ होत जातील अशी शक्यता बळावते, त्यामुळे या गोष्टीचा अनेक लोकांनी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही पदरी निराशाच पडली. मृत पक्ष्यांमध्ये प्रामुख्याने पाणकावळा, बगळे, तसेच काही स्थलांतरित पक्ष्यांचा भरणा असतो. आणि गम्मत म्हणजे हेच पक्षी मारतात, लांबून येणारे म्हणजे  दूर अंतरावरून स्थलांतर करून येणारे पक्षी ह्या घटनेमध्ये भाग घेत नाहीत. ते मात्र अलिप्त असतात, असे का याचेही खास कारण मिळाले नाही. पावसानंतर होणाऱ्या वातावरणातील बदलांमुळे पक्षी असे वागत असतील असा एक अंदाज आहे, मात्र काही ठोस असे हाताला लागले नाही.

त्यामध्ये जगप्रसिद्ध पक्षीनिरीक्षक सलीम आली ह्यांचा पण समावेश आहे. पण ह्या घटनेचे निश्चित कारण काय असावे ह्याचे कोडे अजून उलगडू शकले नाही. गावकऱ्यांमध्ये पक्षी न खाण्याबाबत तसेच सापळे लावून पक्षी न पकडण्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. तसेच अनेक जागतिक संघटनांनी ह्या घटनेमध्ये मागच्या काही वर्षात लक्ष घालायला सुरुवात केली आहे.

हाजारोंच्या संख्येने पक्षी मरतात मात्र कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे. तसेच विशिष्ट प्रकारच्या हवामानामध्ये पाण्याखाली चुंबकीय तरंग उत्पन्न होतात आणि त्यामुळे पक्षी वेड्यासारखे वागतात असा पण एक समज आहे. मात्र एका विशिष्ट वेळी ते असे का वागत असावे याविषयी ही अनेक मतभेद आहेत. अशा प्रकारच्या घटना बाकी देशांतही म्हणजे  फिलिपीन्स, मलेशिया देशांत, तसेच भारताच्या मिझोरम राज्यामध्ये पण अधून मधून घडत असतात.

प्रकार काही नवीन काही जुनाच आहे मात्र तरीही प्रकाश पाहून त्याच्यावर जीव देणाऱ्या पकोळ्या ही असेच काही वागत असतात.पक्ष्यांची आत्महत्या हा प्रकार खूप विचित्र तसेच हृदयदावकच म्हणावा लागेल.

मृत पक्ष्यांमध्ये प्रामुख्याने पाणकावळा, बगळे, तसेच काही स्थलांतरित पक्ष्यांचा भरणा असतो. मुळात नैसर्गिकरित्याच हे पक्षी अजूनही गोष्टींना तोंड देत असतात. त्यातून वाचले तरी आणखी अश्या गोष्टींचा सामना करून जगत त्यांची वाटचाल दुर्मिळते कडे चालली आहे असेच वाटते. आणि गम्मत म्हणजे हेच पक्षी मारतात, लांबून येणारे म्हणजे  दूर अंतरावरून स्थलांतर करून येणारे पक्षी ह्या घटनेमध्ये भाग घेत नाहीत. ते मात्र अलिप्त असतात, असे का याचेही खास कारण मिळाले नाही. पावसानंतर होणाऱ्या वातावरणातील बदलांमुळे पक्षी असे वागत असतील असा एक कयास आहे. मात्र खरे काय हे देवालाच माहीत.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल