Home बातमी Teligram वापरताय !! वापरकर्त्यांनों वेळीच सावध व्हा..!!

Teligram वापरताय !! वापरकर्त्यांनों वेळीच सावध व्हा..!!

by Patiljee
974 views
Teligram

सध्याच्या काळात सोशल मीडियाची क्रेझ फारच वाढलेली दिसते. अनके वेळा यातून नवे नवे वाद जन्माला येताना दिसतात. सोशल मीडिया हे देखील एक नवं विश्व झालं आहे. सद्या टेलिग्रामची ही क्रेझ वाढलेली दिसते. टेलिग्रामचा नवा वाद ही अट चर्चेत आला आहे.
काही भामटे याचा फायदा घेत डिप फेक टूलच्या कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर करून सामान्य फोटोला न्यूड बनवून. गैरवापर करण्यात येत आहे. याचे अनेक प्रकार समोर आले आहेत.

टेलिग्रामचा अशा प्रकारे गैरवापर करणाऱ्यांत रशियातील वापरकर्त्यांचा मोठा हात असल्याचं सेन्सिटीच्या संशोधनातून उघड झाले आहे. ही बाब नक्कीच धक्कादायक आहे. अनेक लोक टेलिग्राम वापरतात आणि त्याचा असा वापर होत असल्याने टेलिग्राम वापरकर्त्यांना मात्र याचा त्रास सहन करावा लागत नाही.

गेल्या काही दिवसांत लोकप्रिय झालेले टेलिग्राम हे सोशल मीडिया अॅप आता नव्या वादात सापडले आहे. याच बरोबर हकर्स ही याचा फायदा घेत माहिती चोरून अनेक गैरव्यवहार करत असतात. याच्या वापरकर्त्यांमध्ये आपण शेअर करत असलेल्या मेसेज, फोटो आणि इतर फाईल्स यांच्याबाबत अधिक सुरक्षितता असल्याचा समज या आधी होता. मात्र आता वापरकर्त्यांच्या या विश्वासाला तडा गेला आहे.

यात सुरक्षितता फारशी दिसत नाही मात्र भामटे ही माहिती सहजरीत्या जमवून आपले काम चालवत आहेत. डिप फेक टूलच्या सहाय्याने टेलिग्रामवर शेअर करण्यात आलेल्या सामान्य फोटोंचेही कपडे उतरवून त्यांना शेअर करण्यात येत आहे अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेक युझर्स व्हॉट्सअपसह टेलिग्राम आणि सिग्नल यांसारखे मेसेंजरही वापरतात. व्हॉट्सअपच्या एंड-टू-एंड एनक्रिप्शनवर मात करुन इस्रायलच्या कंपनीने हेरगिरी केली असल्याचा गंभीर प्रकार समोर आला. मात्र हाच धोका इतर मेसेंजरवरही असल्याचं वृत्त आहे.

संशोधकांच्या मते, मल्टी लेयर सिक्युरिटीनंतरही काही बगचा फायदा घेत मेसेंजर हॅक केले जाऊ शकतात. खासकरून तरुणींना आणि अल्पवयीन मुलींना याचे लक्ष बनवण्यात येत असून त्याचा वापर त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी करण्यात येत आहे. युजर्स ची वयक्तिक माहिती चोरून हे भामटे याचा गैरवापर करत आहेत.
आतापर्यंत सुमारे एक लाखांवर महिलांचे न्यूड फोटो अल-बॉटच्या माध्यमातून ऑनलाईन शेअर करण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात हे रॅकेट चालवले जात आहे।
शेअर करण्यात आलेले फोटो हे त्या महिलांच्या सोशल मीडियावरून घेण्यात आले आहेत.

यात काही फोटो हे अल्पवयीन मुलींचेही असल्याचं लक्षात आलं आहे. यासर्वांचा उपयोग ब्लॅकमेल करण्यासाठी करण्यात येत आहे. ही धक्कादायक बाब डिप फेक टूलवर संशोधन करणाऱ्या सिक्युरिटी कंपनी सेन्सिटीच्या संशोधनातून उघड झाली आहे. व्हॉट्सअपच्या हॅकिंगचा प्रकार समोर येताच टेलिग्राम आणि सिग्नल मेसेंजर युझर्सची संख्या वाढली असल्याचंही दिसून आलं. टेलिग्रामवर व्हॉट्सअपप्रमाणे एंड-टू-एंड एनक्रिप्टेड फीचर मिळत नाही. दरम्यान, यामधील प्रायव्हेट चॅट हे फीचर काही प्रमाणात सुरक्षित मानलं जातं.

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार जुलै 2020 पर्यंत डिप फेकचा वापर करून 1,04,882 महिलांचे न्यूड फोटो तयार करून ते टेलिग्राम चॅनेलच्या माध्यमातून सोशल मीडियावर टाकण्यात आले आहेत आणि या वापरकर्त्यात 70 टक्के लोक रशिया आणि आजूबाजूच्या देशातले आहेत तर काहीजन युरोपीय देशातील आहेत असे हे संशोधन सांगते. ही बाब लक्षात आल्यानंतर मात्र आता या सर्व प्रकाराकडे गांभीर्याने बघण्याची वेळ आहे.

हे नाव नसलेलं बॉट कृत्रीम बुध्दीमत्ता आणि मशिनच्या लर्निंगचा उपयोग करून टेलिग्रामच्या फोटोवर काम करतं आणि सामान्य फोटोंना न्यूड बनवतं. यात चेहरा क्रॉप करून न्यूड बॉडीशेप दिले जातात. आणि सोशल मीडिया वर पसरवले जातात. या सर्व प्रकारामुळे मात्र महिलांना नाहक बदनामीला सामोरे जावे लागत आहे. ह्याकर्स द्वारा तयार केलेलं डीप फेक टेक्नॉलॉजीचा वापर करून अनेक फेक व्हिडियो तयार केले जातात. यात आर्टिफिशेल इंटिलेजन्सचा म्हणजे कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर केला जातो. ज्यामध्ये लोकांनी एखादी कधीच न केलेली गोष्ट दाखवली जाते वा न बोललेलं वाक्य त्यांच्या तोंडी घातलं जातं. हे सर्व कृत्रिमरीत्या केलं जातं.

गेल्या काही वर्षात डिप फेकच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले असे अनेक व्हिडियो समोर आले आहेत जे जराही फेक न वाटता ओरिजीनल वाटतात. या पध्दतीने अनेक सेलिब्रेटींचे पॉर्न व्हिडियो तयार केल्याचं आणि त्या व्हायरल केल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेकदा यामुळे अनेकांना बदनामी ला सामोरे जावे लागत आहे.
व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामवर तुम्हाला ज्या इमेज आणि ऑडिओ दिल्या जातात त्यात हॅकर्स छेडछाड करू शकतात, असा इशारा सायबर सेक्युरिटी फर्म ‘सायमन्टेक’ने दिला आहे. सोशल मीडियाच्या सेक्युरिटीत मीडिया फाइल जेकिंगमध्ये अनेक त्रुटी आहेत असेही सांगितले गेले आहे.

का आहे हे अल- बॉट

अल-बॉट हे मोफत वापरता येते. सामान्यत: ते सेमी
न्यूड फोटो वितरित करते पण कोणी वापरकर्त्याने मागणी केली तर पैसे घेऊन पूर्ण न्यूड फोटो तयार करते. अनेकदा हे पॉर्न साईड वर ही टाकले जातात. याच मोठं रॅकेट चालवलं जात हे अनेकदा समोर आलेलं आहे . अनेक वापरकर्त्यांच्या तक्रारीं नंतर हा प्रकार समोर आला आहे.

यापासून बचाव करायचा असेल तर आपण आपल्या सोशल मीडियाच्या फ्रेंड लिस्टमध्ये अनोळखी माणसांना अॅड करू नये. आपली खाजगी माहिती फोटो शक्यतो प्रसारित करू नये. तसेच ज्यात आपले खासगी फोटोंची मागणी केली जाते अशा सोशल मीडियावर चालणाऱ्या फेक कॅम्पेनमध्ये सामील होऊ नये. अकाऊंट ला प्रायवसी करून ठेवावी.

भामटे ही माहिती कुठून जमतात –

सोशल मीडिया वर अनेक नवीन ट्रेंड येतात. चॅलेंज दिलेले असतात त्यात आपले फोटो आपण टाकतो. अनेकदा बऱ्याच अप्लिकेशन मध्ये आपण म्हातारे झाल्यावर कसे दिसू. चेहऱ्याचे सौदर्य किती टक्के आहे. असे करून त्यात आपण फ्रंट कॅमेरा चा वापर करतो. फेसबुकवर असे अनेक अॅप आहेत जे आपण कोणत्या अभिनेता वा अभिनेत्रीप्रमाणे दिसतो, आपण मागील जन्मी कोण होतो, आपले भविष्य काय, किती पैसा कमावणार अशा प्रकारची माहिती देतात. खरे तर हे अॅप आपला डाटा चोरत असतात आणि भविष्यात त्याचा गैरवापर होऊ शकतो. अशा अॅप पासून आपण दूर राहिले पाहिजे.
अनकेदा लिंक मिळतात त्यावर क्लीक केल्यावर आपली वयक्तिक माहिती चोरली जाऊ शकते.म्हणून गैरप्रकारांना टाळण्यासाठी शक्य तितके सावध रहा.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल