नवी मुंबई : पनवेल इंडिया बुल या क्वारंटाइन सेंटर येथे अत्यंत काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. तर सादर घटना अशी आहे की, पनवेल क्वारंटाइन सेंटर म्हणजे जेथे पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील करोनाबाधित आणि करोना संशयितांना ठेवण्यात येते पण ही घटना वाचून तुम्हाला नक्की वाटेल की आपली मुलगी किंवा बहीण खरोखर या ठिकाणी सुरक्षित आहेत का? तर चाला बघुया नक्की काय प्रकार घडला आहे तो.
या क्वारंटाइन सेंटर मध्ये हा प्रकार गुरुवारी रात्रीच्या वेळी घडला आहे. यातील आरोपी म्हणजे तो व्यक्ती आणि पीडित म्हणजे ती महिला दोघेही कोरोणा पीडित आहेत. या आरोपीने वेळेची संधी साधून या महिलेवर बलात्कार केला.
पण या महिलेने तसा आरोपही केला आहे पण तरीही इतका मोठा गुन्हा केला असल्याने या युवकाला अजुनपर्यंत अटक झालेली नाही. कारण तो कोरोना रुग्ण आहे. यामध्ये आरोपी आणि पीडित हे पहिल्यापासून दोघांना ओळखत ही नाहीत अशी माहिती या महिलेच्या सांगण्यावरून समोर आली आहे.
क्वारंटाइन सेंटरमध्ये आपण उपचार घेण्यासाठी जातो पण या ठिकाणी ही आले प्रकार घडत राहिले तर महिलांनी विश्वास तरी कोणावर ठेवायचा त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. सदर युवकावर गुन्हा दाखल झालेला आहे. सध्या ही बातमी संपूर्ण सोशल मीडियावर वाऱ्या सारखी पसरत आहे.
हे पण वाचा लॉक डाऊन