बिग बॉस या शो चे आतापर्यंत १३ भाग झाले आहेत. सध्याच तेरावा भाग संपला आणि त्याचा विजेता सिध्दार्थ झाला आहे. पण खरंच का या शो मध्ये आलेल्या सर्व कलाकारांना काम मिळते का ही एक मोठी बाब आहे कारण आतापर्यंत होऊन गेलेल्या या शो मधील आपण आज जे कलाकार पाहणार आहोत ते या शो मध्ये आपल्याला पाहायला मिळाले पण या शो नंतर ते कुठेतरी गायब झाल्या सारखे वाटतात.
मनवीर गुर्जर
मनवीर गुर्जर यान बिग बॉस 10 या शो चे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर तो खतरों के खिलाडी या शो मधे आपल्याला पाहायला मिळाला होता पण त्या नंतर त्याला आपण कशातच पहिले नाही.
प्रवेश राणा
प्रवेश राणा हा बिग बॉस 3 मधील स्पर्धक होता. त्याने वाइल्ड कार्ड म्हणून या शो मध्ये एंट्री केली होती. अगोदर टीवी मालिका आणि बॉलिवुड मध्ये काम केले होतें त्यानंतर 2016 ला त्याने लग्न केल्यानंतर या इंडस्ट्रीला रामराम ठोकला.
अमर उपाध्याय
अमर उपाध्याय याने बिग बॉस सीजन 5 मध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. याअगोदर क्योंकि सास भी कभी बहू ही लोकप्रिय मालिका अत्यंत गाजली होती. यामध्ये अमर उपाध्याय आपल्याला पाहायला मिळाला होता पण बिग बॉस नंतर ही या अभिनेत्याला कोणत्याच मालिकेमध्ये पाहायला मिळाले नाही.
आकाशदीप सहगल
आकाशदीप सहगल हा अभिनेता आपल्याला बिग बॉस सीजन 5 मध्ये पाहायला मिळाला होता. त्याने अनेक बॉलिवुड तसे साऊथ चित्रपटामध्ये काम केले होते पण बिग बॉसच्या या सीजन नंतर त्याला कोणती मालिका मिळाली नाही हे कळते.
रिमी सेन
रिमी सेन ही बॉलिवुड अभिनेत्री तिने याअगोदर अनेक सिनेमे केले पण बिग बॉस या शो मध्ये झळकल्यांनतर तिला पुन्हा कोणत्याच सिनेमात पाहायला मिळाले नाही.
मोनिका बेदी
मोनिका बेदी ही अभिनेत्री आपल्याला बिग बॉस सीजन 2 मध्ये पाहायला मिळाली होती. त्यानंतर ही तिला अनेक चित्रपट मिळाले होते पण तरीही तो पाहिजे तितकी लोकांच्या नजरेत भरली नाही.
जुल्फी सईद
जुल्फी सईद या अभिनेत्याला आपण बिग बॉस सिझन 2 मध्ये पाहिले आहे. त्याने मॉडेलिंग ही केले आहे शिवाय यानंतर ही त्याला कितीतरी चित्रपट मध्ये काम केले होते पण तरीही हा अभिनेता अजुन तरी या फिल्म इंडस्ट्री पासून लांबच आहे.
आशुतोष कौशिक
बिग बॉस 2 मध्ये आशुतोष कौशिक हा अभिनेता आपल्याला पाहायला मिळाला होता आणि याने या सीजन ची ट्रॉफी ही पटकावली होती. त्यानंतर या अभिनेत्याला लाल रंग, शॉर्टकट रोमियो, लव के फंडे या चित्रपटांमधे काम मिळाले पण हवी तशी प्रसिध्दी मिळाली नाही.