करोना विरुद्धच्या लढाईसाठी अनेक लोकं आपल्या मदतीचा हात पुढे करत आहेत. आतापर्यंत अनेक सेलेब्रिटी राजकारणी, सैनिकांनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, खेळाडूंनी आणि सामान्य व्यक्तींनी सुद्धा मदत केली आहे. यूट्यूबवरील अनेक असे क्रिएटर आहेत ज्यांनी सुद्धा पैसे डोनेट केले आहेत. यूट्यूब संसेशन म्हणून ज्याची ओळख आहे असा भुवन बाम ने सुद्धा आज सर्वांची मने जिंकली आहेत.
भुवनने आपण मार्च मध्ये यूट्यूब मार्फत कमावलेले सर्व पैसे करोनाच्या लढाईसाठी डोनेट केले आहेत. त्याने हे पैसे विभागून प्रधानमंत्री रिलीफ फंड, मुख्यमंत्री कोश आणि फिडिंग इंडिया ह्यांना डोनेट केले आहेत. सूत्रानुसार हा आकडा दहा लाखाचा आहे. त्याने केलेल्या ह्या गोष्टीमुळे सर्व कडून त्याचे कौतुक होत आहे. पण त्याच्या मते सध्या भारत देशाला आपली गरज आहे. आपण खुल्या मनाने ह्या विषाणूवर मात करण्यासाठी पैसे डोनेट करणे गरजेचे आहे.
सध्या डॉक्टर, पोलिस, सरकारी कर्मचारी, सरकारी यंत्रणा आपल्या सुरक्षेतेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. मग आपण पण एवढे छोटे काम तर करूच शकतो. काही दिवसापूर्वी सर्व जवानांनी आपल्या एक दिवसाचा वेतन डोनेट केले होते. तो फोटो शेअर करताना भुवन ने रिअल हिरो म्हणून कमेंट केलं होतं. त्याला रिप्लाय करताना एका नेटकऱ्याने असे लिहिले होते तू पण काहीतरी डोनेट कर आणि स्क्रीनशॉट टाक. त्याला रिप्लाय करताना भुवन म्हणाला होता. सर्वच गोष्टी जगजाहीर करायच्या नसतात. काही गोष्टी पडद्या मागून सुद्धा होऊच शकतात.

भुवन अगोदर अमित भडाना ने पाच लाख तर आशिष चंचलानीने तीन लाख रुपयाची मदत केली आहे. अनेक युट्यूबर समोर येत आहेत.