वृंदावर माझं अतोनात प्रेम होत. पण तीच लग्न झाले आणि माझा प्रेम या शब्दावरून विश्र्वासच उडाला. त्या दिवसापासून ठरवले आता कोणाच्या प्रेमात पडायचे नाही की, त्या प्रेमात वाहवत जायचे नाही. माझ्यासारखे असे कित्तेकजन असतील ज्यांना हा त्रास सहन करावा लागला असेल. काहींनी तर टोकाचा निर्णयही घेतला असेल. पण मी तसे मुळीच करणार नाही. कारण माझ्या जीवावर माझं अख्खं कुटुंब आहे. त्यांच्यासाठी तरी मला जगायचं आहे.
ते दिवस अजूनही आठवतात मला किती शपथा आणि किती आणाभाका घेतल्या होत्या तिने पण काय माहीत होत त्यांना काहीच किंमत नसेल म्हणून, अशा खूप आठवणी आहेत त्या मला रोजच येतात. कारण लगेच तरी विसरू शकत नाही ना इतके अनमोल क्षण. आमचं लग्न न होण्यासाठी आमच्यातील तफावत कारणीभूत होती. म्हणजे आमचं कुटुंब मध्यमवर्गीय आणि ती खूप मोठ्या म्हणजे श्रीमंत कुटुंबात जन्माला आलेली. तिला तिच्या बरोबरीचा जोडीदार मिळाला आणि मला सोडून दिलं असं अर्ध्यावर, खूप त्रास होतो ते दिवस आठवले की पण मनाची समजूत घालयाची आणि गप्प बसायचे. हेच आतापर्यंत करत आलोय.
तिच्या नंतर मला कितीतरी सुंदर मुली दिसल्या पण मनात भरल्या नाहीत, कारण मनात फक्त एकच होती. तिला मनातुन बाहेर काढण्याचा प्रयत्न ही करत होतो. पण काही केल्या निघत नव्हती. ज्या दिवशी ती लग्न करून गेली त्या दिवशी टेन्शन मध्ये एक बाटली दारू घेतली आणि त्या दिवसापासून तीच माझी सोबती झाली. मित्र ही समजाऊन थकले पण काय करू माझे मन समजायला तयार नव्हते.
माझ्या घरातील माझ्या लग्नाचे बघत होते. पण मला लग्न अजिबात करायचे नव्हते. शिवाय माझ्या सारख्या दारुडयाला मुलगी कोण देणार ? आणि माझ्या आता मुलींवर विश्वास तर अजिबात नव्हता. त्यामुळे लग्न करणे ही गोष्ट खूप लांबची. नाही बोलून एक मुलगी मला सांगून आली, गरीबाची होती ती मुलगी. घरात सावत्र आई त्यामुळे माझ्या गळ्यात बांधायला निघाले होते. पण मी घरच्यांना नाहीच सांगितले मग आईने माझ्यापुढे रडगाणे चालू केले जेवण टाकले, समजावलं शपथा घातल्या, आणि मला कसेतरी लग्नासाठी तयार केले.
लग्न झाले तरी मी काय तिचा चेहरा पहिला नव्हता. कशी दिसते काय याच्याकडे माझे अजिबात लक्ष नव्हते, पण तशी ती मनाने खूप चांगली आहे असे घरातल्यांच म्हणणं होत. पण तरीही माझ्या मनात उतरली नव्हती आणि कधी उतरणार ही नाही. पण खरं सांगू माझा अंदाज चुकला ती म्हणजे माझी बायको मनाने इतकी चांगली की तिच्यामुळे आज माझी दारू ही सुटली आणि माझा संसार ही फुलला आहे. तिने ते केले म्हणजे करून दाखवले. आमच्या घरातल्यांना समजून घेतले, माझे बाबा एकवेळ खूप आजारी होते. त्यांची ही सेवा तिनेच केली. खर बोलायला गेलो तर तिच्याकडे एकप्रकारची जादू आहे. ती जेवण खूप चविष्ट बनवते, ही जादू प्रत्येक स्त्री मध्ये असायलाच हवी. सकाळी लवकर उठणे आणि सगळ्यांचे करणे ते ही मनापासून त्यामुळेच ती मला आवडायला लागली असे बरेच प्रसंग आहेत. ज्यामुळे आम्ही दोघं एकत्र येत गेलो. आज आम्हाला एक मुलगी आहे खूप गोड आहे तिच्यासारखी दिसते.
आपल्या मध्ये ही असेच काही मुल आणि मुली ही असतील त्यांच्या बाबतीत ही असेच काही घडले असेल. पण हे नेहमी लक्षात ठेवा जे होते ते चांगल्या साठीच होते आणि जे होणार आहे ते ही चागलेच होणार आहे. त्यामुळे झालेल्या गोष्टीचा विचार न करता नेहमी भविष्याचा आणि वर्तमानाचा विचार करा. कारण भूतकाळ फक्त त्रास देतो.
संसाराच्या सुखासाठी ह्या कथा पण वाचा
लेखक : पाटीलजी