दम लगाके हैशा या चित्रपटामध्ये आपल्याला गोल मटोर आणि गुबगुबीत अशी भूमी पेडणेकर पाहायला मिळाली होती. खर तर या चित्रपटामध्ये तिची शारीरिक समस्या यावरच संपूर्ण चित्रपट आपल्याला पाहायला मिळाला होता. यात तिने जवळ जवळ 89 किलो इतके वजन होते. यात तिचा पती आयुष्यमान खुराणा याची भूमिका आपल्याला एका वैतागलेल्या नवऱ्याची पाहायला मिळते. आणि यात दाखवलेली भूमी पेडणेकर ही खूप साधी सरळ आणि गावाकडील अशी आहे.
पण हा चित्रपट झाल्यानंतर भूमी हिला आपल्या पुढील वाटचालीसाठी आपले वजन कमी करायचे होते आणि खरोखर तिने आपले 32 किलो वजन कमी केले होते. त्यासाठी तिने जास्त काही केले नाही पण जे काही केले ते अगदी साधे सुधे घरातील जेवण आणि फक्त तेच खाणे हे तिच्या डायट मधील एकमेव सत्य आहे . या भूमिकेत तिचे वजन इतके जास्त वाढवले होते की ते कमी करण्यासाठी एखाद्या महिलेने खूप मेहनत घेतली असती पण तिने आपल्या आहारात थोडेफार बदल केले ते म्हणजे तिने आपल्या आहारातून साखर अजिबात वर्ज्य करून टाकली. तिला गोड पदार्थ खायला खूप आवडायचे पण वजन तर कमी करायचे होते म्हणून तिने लो कॅलरी असणारी ब्राऊन शुगर वापरायला सुरुवात केली.
त्यासाठी तिने कोणत्याच न्युट्रिशियन किंवा डाएटिशियनचा सल्ला न घेता आपल्या परीने आहात घेण्याचे ठरवले आणि सर्वात उत्तम म्हणजे घराचे जेवण घेतले. कार्बोहायड्रेट्स सेवन करण्यावर सुद्धा तिचा कंट्रोल होता. सकाळी उठल्यावर पहिल्यांदा एक ग्लास गरम पाणी पिणे आणि त्यानंतर detox water पिने. तिने सकाळी डीटोक्स वॉटर घ्यायला सुरुवात केली. यासाठी एक लिटर पाणी घ्या त्यामध्ये तीन काकड्या कापून टाका शिवाय लिंबू ही कापून टाका आणि काही तास हे मिश्रण फ्रीज मध्ये ठेवा. रात्री ठेऊन मग सकाळी पिण्यासाठी ही वापरू शकता. रोज आवडत असणाऱ्या गाण्यावर डान्स करायचे आणि जेवायच्या अगोदर 30 मिनिटे उड्या मारायच्या.
हा लेख यासाठी आहे की जेणेकरून ज्या महिलांना आपले वजन कमी करायचे आहे आणि प्रयत्न करूनही होत नसेल त्यांनी हा प्रयत्न नक्की करा. शेवटी हे जग बाहेरील सुंदरता पाहत असते मनाची सुंदरता त्याला कधीच दिसत नाही.