Home संग्रह हे आहेत भारतातील सगळ्यात विषारी चार साप, चावल्यानंतर हॉस्पिटल मध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही

हे आहेत भारतातील सगळ्यात विषारी चार साप, चावल्यानंतर हॉस्पिटल मध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही

by Patiljee
1056 views

आज आपण अशा सापा बंद्दल बोलणार आहोत जे आपल्या घराशेजारी किंवा आजूबाजूला कुठेही लपलेले असतात आणि कधी कधी आपण सहज त्या ठिकाणी गेल्यास आपला घात होतो. भारतातील 95 टक्के साप हे बिन विषारी आहेत तर फक्त 5 टक्के साप हे विषारी असतात पण ते कोणते हे ही आपल्याला ओळखू यायला हवेत. त्यासाठी आपल्याला थोडीफार माहिती हवी आणि म्हणून हे असे चार प्रकारचे साप आहेत जे चावल्याने तुम्हाला धोका आहे तर असे कोणते साप आहेत ते आज आपण पाहणार आहोत.

घोणस
या चार विषारी सापांपैकी घोणस हा एक साप आहे. ह्याला इंग्लिश मध्ये रसल वायपर स्नेक असे म्हणतात. या सापाच्या विष ग्रंथी मध्ये हिमोटॉक्सिस नावाचे विष असते. हा साप दिसायला अगदी अजगर सारखा दिसत असतो. त्यामुळे काही लोक सहजरित्या हा साप धरायला जातात आणि आपला जीव गमावून बसतात. या सापाला जेव्हा राग येतो किंवा आपल्या शत्रुची जाणीव होते तेव्हा तो आपली शेपटी हलवून आवाज काढत असतो. हा आवाज कूकरच्या शिटी सारखा असतो. तसे भारतातील प्रत्येक भागात याला वेगवेगळ्या नावाने ओळखतात. पण महाराष्ट्रात याला घोणस असे म्हणतात. हा साप चावल्यावर आपल्या शरीरातील नसा या फाटतात त्यामुळे ज्या ठिकाणी हा साप चावतो त्या ठिकाणी गँगरीन ही होऊ शकतो आणि त्यामुळे मनुष्याचा जीव वाचवण्यासाठी तो भाग किंवा अवयव शरीरापासून वेगळा करावा लागतो.

मण्यार
हा सर्वाधिक विषारी म्हणून ओळखला जातो. अंगावर सफेद पट्टे आणि संपूर्ण शरीर काळया किंवा निळ्या रागाचे असते. याला इंग्लिश मध्ये कॉमन क्रेट स्नेक म्हणतात. खूप विषारी असला तरी स्वभावाने शांत मानला जातो हा साप. या सपामधे न्युरोटॉक्सिक हा विष पहिला जातो या सापामधे कोब्रा सापापेक्षा पाच पटीने घातक असा विष आहे शिवाय हा सहज कोणाला चावणार नाही पण कोणाचा धक्का लागल्यास मात्र हा साप लगेच चावतो. हा साप जास्तीतजास्त रात्रीस आपली शिकार पकडण्यासाठी निघत असतो. जास्तीत जास्त आपल्या अंथरूनाखली सापडणारा साप चावल्यास जीव जाण्याचा धोका जास्त असतो. या सापाला सायलेंट किलर असेही म्हणतात कारण हा साप व्यक्ती झोपेत असताना चावल्यावर त्याला कळत नाही कारण सापाचे दात ही त्या ठिकाणी दिसत नाहीत म्हणून हा साप चावल्यावर लवकरात लवकर हॉस्पिटल मध्ये जा नाहीतर व्यक्तीचा जीव वाचण्याची काही शक्यता नसते.

नाग
या सापाला इंग्लिश मध्ये इंडियन स्पॅक्टिकल कोब्रा साप असे म्हणतात या सापामधे ही न्युरोटॉक्सिक नावाचे विष असते खूप जास्त घातक असणारा हा विष आहे चावल्यास आपल्याला हॉस्पिटल मध्ये जाण्याशिवाय पर्याय नसतो. भारतातील प्रत्येक ठिकाणी हा साप पहिला जातो याच्या फण्यावर पाठीमगे असणारा यू आकार हा साप जसा मोठा होता जातो तसा तो आकार गायब होतो.

फुरशा
या सापाला इंग्लिश मध्ये सॉस स्कॅल वायपर असे म्हणतात सगळ्याच ठिकाणी हा साप आढळतात नाही. डोंगराळ भागात जास्त प्रमाणात पाहिला जातो हा साप. तसेच यांच्यामध्ये हिमोटॉक्सिस नावाचे विष आढळते खूप जास्त घातक असतो हा विष. तसेच हा साप निसर्गाच्या त्या त्या भागात वेगवगल्या रंगाने आपल्याला पाहायला मिळतो.

ह्या चार विषारी सापांपैकी तुम्ही कोणता साप प्रत्यक्ष डोळ्यासमोर पाहिला आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल