Home खेळ/Sports भारतरत्न मिळाल्यानंतर सचिन तेंडुलकरला मिळतात ह्या मोफत सुविधा

भारतरत्न मिळाल्यानंतर सचिन तेंडुलकरला मिळतात ह्या मोफत सुविधा

by Patiljee
530 views

भारतातील सर्वात मानाचा आणि उच्च समजला जाणारा पुरस्कार म्हणजे भारतरत्न. ज्यांनी भारत देशाचे नाव उज्ज्वल केले अशानाच हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. ह्या अगोदर खेळ क्षेत्रात हा पुरस्कार देण्यात येत नव्हता. पण नंतर मात्र नियमात बदल करून खेळाडूंना भारतरत्न देऊ शकतो असा प्रस्ताव मांडण्यात आला आणि तो मंजूरही झाला. भारतीय क्रीडा विभागात फक्त मराठमोळ्या सचिन तेंडुलकर ह्यानाच भारतरत्न प्रदान करण्यात आला आहे.

Source Google

तुम्हाला उत्सुकता असेल की कसा असतो भारतरत्न मेडल, तुम्ही काहींनी पाहिले सुद्धा असेल. हे मेडल तांब्याच्या बनलेल्या पिंपळाच्या पानाच्या आकाराचा असतो. ४८ मिमी लांब आणि ३ मिमी जाड असतो. ह्याच्या समोरच्या बाजूला प्लेटिनम पासून बनवलेल्या सूर्याचे चित्र असते आणि मागच्या बाजूला अशोकस्तंभ तुम्हाला पाहायला मिळेल. ह्याच मेडलवर सुवर्ण अक्षरात सत्यमेव जयते असे लिहलेले असते. गळ्यात घालण्यासाठी ह्यासोबत सफेद रंगाचा रिबीन सुद्धा असतो.

१९५४ मध्ये भारतरत्न हा गोल्ड सोन्याचा पाहायला मिळायचा. मग काहीच वर्षात ह्याचे रूप बदलून हे नवीन रुप देण्यात आलं. भारतरत्न पुरस्कार कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीला मिळू शकतो. फक्त त्यांनी आपल्या क्षेत्रात देशाचे नाव उंचावलेले असलेले पाहिजे. निरपेक्ष भावनेने हा पुरस्कार देण्यात येतो. हे मेडल राष्ट्रपती कडून प्रदान करण्यात येतं. पण प्रधानमंत्री एका वर्षभरात तीन व्यक्तींची नावे भारतरत्न साठी राष्ट्रपतींना देऊ शकतात.

तुम्हाला वाचून थोडा धक्का नक्कीच बसेल पण भारतरत्न मिळाल्यानंतर त्यासोबत कोणतीच रक्कम मिळत नाही. पैशांच्या बाबतीत कोणतीच नगद मिळत नाही. पण ज्या व्यक्तीला भारतरत्न दिला जातो त्या व्यक्तीला अनेक सुखसुविधा प्रदान केल्या जातात. तर मित्रानो जाणून घेऊया अशा व्यक्तींना कोणकोणत्या सुखसुविधा मिळतात.

१. अशा व्यक्तीला भारतातील कोणत्याही रेल्वेमध्ये फर्स्ट क्लासची तिकीट फ्री असते. ते कधीही आणि कुठेही प्रवास करू शकतात.

२. भारतरत्न मिळालेल्या व्यक्तीला आयुष्यभर टॅक्समुक्त राहतो.

३. अशा व्यक्तींना नेहमीच झेड प्लस सेक्युरिटी दिली जाते.

४. असे व्यक्ती कोणत्याही राज्यात गेले तर तिथले राज्यसरकार अतिथी स्वरूपात त्यांचे स्वागत करतात. त्या राज्यात फिरण्यासाठी त्यांना परिवहन, राहण्याची सोय केली जाते. पर्सनल स्टाफ आणि ड्रायव्हर सुद्धा सोबत दिले जाते. ह्याच सुख सुविधा त्यांच्यासोबत असलेले त्यांची मुले आणि पत्नीला पण लागू होतात.

५. भारतरत्न मिळालेल्या व्यक्तीला कॅबिनेट रँक प्रमाणे महत्त्व दिले जाते.

६. विदेशी दौऱ्यामध्ये विदेशात राहत असलेले आपले भारतीय दूतावास त्यांच्या ह्या दौऱ्यात नेहमीच सोबत असतात.

७. भारतरत्न मिळालेला व्यक्ती डिप्लोमैटिक पासपोर्ट चा हकदार असतो.

सचिन तेंडुलकर ह्यानासुद्धा ह्या सर्व सुख सुविधा मिळत आहेत.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल