तर मित्रानो आज आपण पाहणार आहोत संपूर्ण जगात मैत्रीची उपमा कशाला देताच येणार नाही. कारण मैत्री असतेच तशी प्रेमळ आणि निस्वार्थी पण जिथे ही मैत्री पैशाने होते त्याला मैत्री म्हणता येणार नाही कारण मैत्री मध्ये पैसाने मोजता येत नाही आज आपण अशाच मैत्री बद्दल बोलणार आहोत ही आहे आपल्या भारतीय क्रिकेट पटू यांची तुम्हाला कदाचित माहितही असेल याबद्दल पण तरीही आपण आज थोडीफार माहिती सांगणार आहोत यांच्या मैत्रीबद्दल. खेळातील स्पर्धांनी नेहमी लोकांना जवळ आणले आहे. खूप वर्षांपासून क्रिकेट क्षेत्रात तीव्र प्रतिस्पर्धी असणारे खेळाडू क्रिकेटच्या खेळा बाहेरही चांगले मित्र झालेले आहेत.तीव्र स्पतिस्पर्धी एकमेकांचे एवढ्या चांगल्या मानवी बंधनात असू शकतील ह्याची कल्पना करणे सुद्धा अवघड जाते.
- सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी
भारतीय क्रिकेट टीम मधला पूर्व खेळाडू आणि उत्कृष्ट फलंदाज तुम्ही आम्ही सगळेच याला ओळखतो. पुढे मुंबईच्या शालेय क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्ध्यांना भारी पडणारी ‘झकास’ जोडी म्हणजे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी. पुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानातही ते काही काळ एकत्र खेळले, पण हळू हळू या दोघांमध्ये दुरावा येत गेला होता पण आता तो सर्व दुरावा मिटला आहे आणि सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी मैत्री पुन्हा नव्याने उदयास आली आहे.

- विराट कोहली आणि धोनी
क्रिकेटमध्ये विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांची मैत्री घट्ट आणि वेगळी आहे. हे आपणा सर्वांना माहित आहे विराट कोहली नेहमी धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम द्यायचा. कोहलीने धोनीच्या वाढदिवसानिमित्त दोघे सोबत असलेला एक फोटो ट्विटरवर शेअर केला होता. आणि लिहले होते की ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा माही भाई. खूप कमी लोक आहेत, जे विश्वास आणि आदर याचा अर्थ समजतात आणि मला आनंद आहे मागील अनेक वर्षांपासून माझी तूझ्याशी मैत्री आहे. तू आमच्या सर्वांसाठी मोठा भाऊ आहे आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे तू नेहमी माझा कर्णधार असशील. खूप वर्षांपासून क्रिकेट क्षेत्रात तीव्र प्रतिस्पर्धी असणारे खेळाडू क्रिकेटच्या खेळा बाहेरही चांगले मित्र झालेले आहेत.तीव्र प्रतिस्पर्धी एकमेकांचे एवढ्या चांगल्या मानवी बंधनात असू शकतील ह्याची कल्पना करणे सुद्धा अवघड जाते.

- व्ही.व्ही.एस.लक्ष्मण आणि राहुल द्रविड
एक भारतीय संघाची कठीण भिंत आणि दुसरा खेळाडू हा सर्वांसाठी खूप स्पेशल असे हे खेळाडू अजूनही भारतीय जनतेच्या मनात घर करून आहेत. हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र असतील यात मुळात शंकाच नाही.त्यांचा मैत्रीचे बंधन अजूनही खूप घट्ट आहे. बऱ्याचदा ते आपल्या निदर्शनास आले असेलच.

- युवराज सिंग आणि झहीर खान
काही दिवसांअगोदर युवराजचा वाढदिवस झाला त्यासाठी झहीर ह्याची पत्नी सागरिका घाडगेसह उपस्थित होता. आता खेळण्याच्या निमित्ताने एकत्र नसले तरी समारंभात मात्र झहीर-युवी यांची मैत्री दिसून येत असते. विदेशी कोणताही पिकनिक दौरा करायचं असेल तर युवी आणि जॅक सोबतच जातात. युवराज भारतीय संघात परत येण्याचे दरवाजे उघडले जाण्याची शक्यता कमी आहे, परंतु आयपीएलमध्ये तो पुन्हा स्टार होऊ शकतो. झहीरची मैत्री, त्याने दाखवलेला विश्वास युवराज कसा पार पाडतो हे येत्या आयपीएलमधून दिसेलच.

ह्या तुमच्या आवडत्या खेळाडूंमध्ये तुमचा सर्वात आवडती जोडी कोणती ते आम्हाला कमेंट द्वारें कळवा.