आले म्हणायला गेलो तर हे एक कंद आहे. कारण हे मातीत उगवते. बघायला गेलो तर आले तस आपण रोजच कशात ना कशात वापरतो म्हणजे भाजीत, मटण, मच्छी, आल्याचा चहा तर सर्वानाच प्यायला आवडतो तसेच मी लहान होतो तेव्हा आमच्या गावात दुकानात आल्याची वडी मिळायची. इतकी छान लागायची ती खायला आताही मिळत असेल पण मी किती दिवस खाल्लीच नाही. असे हे आल्याचे पदार्थ आपण नेहमीच खातो. पण त्या आल्या मधील महत्वाचे घटक आपल्याला माहीतच नसतात. ज्यामुळे आपले शरीर मजबूत बनतं अनेक आजारांसाठी लढा देण्यासाठी.
ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशांनी रोज आले खाणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आपले रक्त पातळ होते शिवाय ज्यांच्या छातीत दुखत असेल असे वाटत असेल कधी ही अटॅक येईल अशा वेळी आल्याचा काढा करून प्या. शिवाय उपाशी पोटी रोज एक आल्याचा तुकडा चाऊन खा. उच्च रक्त दाबसाठी अत्यंत फायदेशीर आहे आले करून बघा.
सर्दी, खोकला, कफ झाला असेल त्यांनी ही आल्याचा तुकडा चाऊन खा नक्की फरक पडेल. किंवा आल्याचा काढा करून प्या फरक पडेल. किंवा आल्याचा रस मधासोबत चाटा फरक जाणवेल.
ज्या लोकांना जास्त पोटाचे विकार आहेत त्यांनी रोज जेवणाच्या अगोदर आल्याचा तुकडा चाऊन खाणे, मळमळ, उलटी येणे, अपचन, पोटातील गॅस, पोट साफ न होणे यावर अत्यंत फायदेशीर आहे.
दाढ दुखत असेल आणि तुमच्याजवळ आणखी कोणताच मार्ग नसेल तर आल्याचा किस दाढे मध्ये भरून ठेवा.
आल्या मध्ये कारबोहायड्रेड, प्रोटीन, पोटॅशियम, मँगॅनीज, फायबर, कॉपर, हे घटक असतात त्यामुळे हे घटक तुमच्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात.
डोके दुखत असेल तर हे आले घ्या आणि बारीक वाटून याचा लेप डोक्यावर लावा फरक जाणवेल.
सध्याच्या काळात कोणत्याही वयात सांधेदुखी हा आजार प्रत्येकाला होत असतो. यावर आल्याचा रस घेणे आणि आलं, लाल मिरच्या, दालचिनी आणि तिळाचे तेल याचे मिश्रण करून ते लावावे.