जवळ जवळ दोन महिने प्रत्येकजण आपापल्या घरात राहून वेळ काढत आहेत. बाहेर असणारी प्रत्येक दुकाने लॉक डाऊन मुळे बंद होती. केस कर्तनालय सुद्धा बंद असल्याने घरात राहून प्रत्येकजण कबीर सिंघ झाला आहे. अशात अनलॉक वनची घोषणा केल्यानंतर काही भागात वेगवेगळ्या व्यवसायाना सूट दिली आहे. रेड झोन वगळता इतर भागात सलून दुकाने उघडायला परवानगी मिळाली आहे.
ही जरी आनंदाची बाब असली तरी एवढ्यात आनंद व्यक्त करू नका. कारण आता तुमच्या खिशाला दुप्पटीने कात्री बसणार आहे. कारण लॉक डाऊन मध्ये वाढलेली तुमची दाढी आणि केस काढण्यासाठी तुम्हाला सलून मध्ये जास्तीची रक्कम द्यावी लागणार आहे. महाराष्ट्र सलून आणि पार्लर संघटनेने आपले दर दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. अशात प्रत्येक भारतीयाच्या खिशाला नक्कीच कात्री लागणार आहे ह्यात शंका नाही.
अगोदर हेच दर वेगवेगळ्या भागात ५० ते ८० पर्यंत होते. मात्र आता नवीन दरानुसार ग्राहकांना १०० ते १२० रुपये मोजावे लागतील. दाढीचा अगोदरचा दर २० ते ५० ह्या दरम्यान होता. पण आता ह्याच दाढीसाठी तुम्हाला ८० रुपये द्यावे लागतील. सलून व्यवसाय दोन महिने पूर्णतः बंद असल्याने त्यांना सुद्धा खूप मोठं नुकसान झाले आहे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. असे संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
सलून व्यवसायांचे चांगले दिवस तर नक्कीच येतील पण आधीच पैशाची कमी असलेला मध्यमवर्गीय माणूस मात्र आणखी त्रासला जाईल.