खेलरत्न हा क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. मागच्या वर्षी एकदिवसीय क्रिकेट मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे रोहित शर्माचे नाव बीसीसीआय ने खेलरत्न साठी पुढे पाठवले आहे. ह्याच बरोबर रोहित सोबत सलामी करणारा गब्बर म्हणजेच शिखर धवनचे नाव सुद्धा पुन्हा एकदा अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात आले आहे. याआधी २०१८ मध्ये सुद्धा त्याचे नाव पाठवले होते. ह्या लिस्ट मध्ये अजुन नाव जोडले आहे ते म्हणजे जलतगती गोलंदाज इशांत शर्माचे नाव सुद्धा अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात आले आहे.
महिला क्रिकेटमध्ये मागील तीन वर्षांपासून एकदिवसीय आणि टी ट्वेण्टी सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या दीप्ती शर्माचे नाव सुद्धा बीसीसीआयने अर्जुन पुरस्कारासाठी पाठवले आहे. कोरोना महामारी मुळे यावर्षी क्रीडा नामांकने ऑनलाईन मागवण्यात आले आहेत. दरवर्षी हीच नामांकने एप्रिल महिन्यात मागवली जातात.ब्ल
सौरव गांगुलीने ह्याबद्दल बोलताना म्हटले की मागील काही वर्षांपासून रोहित शर्माने भारतीय क्रिकेटसाठी चांगला खेळ खेळला आहे. त्याच्या ह्याच प्रदर्शनामुळे खेलरत्न साठी तो योग्य उमेदवार आहे. ईशांत शर्माचा टेस्ट क्रिकेट मध्ये उत्तम योगदान आहे. सध्या टेस्ट क्रिकेट मध्ये तो वरिष्ठ खेळाडू आहे. त्याने अनेक सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली आहे. शिखर धवनने सुद्धा मागील दोन वर्ष उत्तम कामगिरी केली आहे.
बीसीसीआयकडून ही नामांकने फक्त खेळ मंत्रालयाकडे पाठवली आहेत. पुरस्कार कुणाला मिळणार हे निवड समिती ठरवेल. तुमच्यामते कुणाला हे पुरस्कार मिळायला हवे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.