Home कथा बहिणी सारखं माझ्यावर प्रेम करणारी माझी जाऊबाई

बहिणी सारखं माझ्यावर प्रेम करणारी माझी जाऊबाई

by Patiljee
39778 views
जाऊबाई

आमचं लग्न झालं त्या दिवसापासून आम्ही दोघांनी वेगळा संसार मांडायच असच ठरलं होत पण का कुणास ठाऊक लग्न झालं आणि त्याच घरात राहण्याची वेळ माझ्यावर आली. वेळ आली म्हणता येणार नाही कदाचित मला एकत्र राहायला आवडलंही होत.

माझ्या घरात सासू, सासरे, मोठा दीर आणि माझी मोठी जाव असा आमचा कुटुंब. मोठ्या दिराला मुल बाळ काहीच नव्हतं तरीही त्या दोघांना मुलांची खूप आवड…शेजार पाजाराची लहान मूल आणायची त्यांना खेलवायच आणि खायला द्यायचं हा त्या दोघांचा नेहमीच नित्यक्रम. त्यांच्या लग्नाला आता जवळ जवळ सहा वर्ष झाली होती पण मुल मात्र होत नव्हत.

माझ्या सासू सासऱ्यानी तर बाहेरचे साधू संत ही नाही सोडले. सगळ्यांकडे त्यांच्या बाळासाठी हात पसरले पण काहीच उपयोग झाला नाही. शेवटी आता त्या दोघांनी नशिबावर सोडले आहे…डॉक्टर कडे जाण्याचे ही सोडून दिले आहे. माझी जाव जरी गावात वाढलेली असली तरी तीच्यात असे बरेच गुण होते जे एखाद्या शहरातल्या मुलीलाही लाजवतील. घरात कोणाला काहीही पदार्थ खायला हवं असुदे तिला तो पदार्थ येणारच म्हणजे अगदी पुरणपोळी पासून ते पिझ्झा पर्यंत… सासू सासर्याना काही हवं नको यावर तीच नेहमीच लक्ष असायचं. त्यांची औषध त्यांचे खायचे पियाचे टाईम टेबल सगळं माझ्या जाव बाई बघायच्या आणि म्हणून त्या आमच्या घरात सर्वांच्या लाडक्या होत्या.

त्यांना मुल नव्हते पण तरीही सासू आणि सासऱ्यांनी कधी तिच्याकडे मुलाची अपेक्षा बोलून दाखवली नाही, कारण माझी जाव होतीच तितकी गोड समजूतदार.. तिला स्वतः पेक्षा जास्त आमच्या घरातल्यांची काळजी होती, कोणत्या सूना अशा असतात सांगा मला ज्या अशा असतात शंभरात दोन सापडतील… मी सुद्धा स्वतला त्यात मोजत नाही. कारण माझ्यापेक्षा ती कितीतरी पटीने समजूतदार आणि मनमिळाऊ होती.

तीच खरं प्रेम मला माझ्या त्या दिवसात कळलं, त्या दिवशी मला चक्कर आली होती. तेव्हा तिला म्हणजे माझ्या जावेला, ती हळूच माझ्या कानात येऊन म्हणाली, कळलं मला तू आई होणार आहेस ना..आणि त्या दिवसापासून तिने माझी इतकी काळजी घेतली. मला घरातून बाहेर पाय ठेऊन दिला नाही, घरातील सर्व काम एकटी करायची, मी करायला गेले की मला हाताला धरून बेडरूम मध्ये खेचत न्यायची.

मला खायला काय हवे नको ते बनवायची शिवाय चेहऱ्यावर कोणतेच दमलेले हावभाव न आणता, सातव्या महिन्यातले ओटी भरणे ही तिनेच मस्त पैकी अरेंज केलं होते आणि तिने मला सांगितले नाही तसा दमच भरला. म्हणाली बाळंतपण हे सासरीच होणार. आपल बाळ याच घरात पाहिलं पाऊल ठेवणार, तिच्या या बोलण्यावर मी थोडी हिरमुसले कारण माहेरी जाण्याची ओढ होती, पण तरीही जे प्रेम मला सासरी मिळते आहे तर त्यासाठी मी का माहेरी जाऊ आणि माझ्या जावेची एक तरी इच्छा पूर्ण व्हावी अशी माझी इच्छा होती.

माझ्या जावेने माझ्या साठी खूप केले अगदी माहेरी जशी मुलीची सर्व प्रकारे आवड निवड जोपासली जाते, काळजी घेतली जाते तशीच काळजी माझ्या जावेणे माझी घेतली होती. डिलिव्हरीचा दिवस होता, मला हॉस्पिटलमध्ये अडमिट केले होते. पहिल्यापासूनच सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते, कारण घरात येणारे पहिले बाळ कसे होईल याची चिंता सर्वानाच होती, माझी जाव तर सकाळपासून देवाचे नाव घेत होती.

डिलिव्हरी झाली मुलगा झाला होता, सगळं काही व्यवस्थित होत… माझी जाऊबाई इतकी खुश होती ,की तिला इतक्या आनंदात मी कधीच पाहिले नव्हते, सगळे जण बाळाला बघायला आले, पण मीच म्हणाले बाळाला घ्यायचा पहिला मान त्याच्या मोठ्या आईचा… असे बोलल्यावर माझ्या जावेच्या डोळ्यात चटकन पाणी आलं, त्यांनी बाळाला हातात घेतले आणि त्याच्या वीस एक मुके घेतले असतील, हे बघून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आले.

पाचवीच्या दिवशी काही पावण्या बायका ही आल्या होत्या. माझ्या माहेरच्या काकी, मामी, वहिनी सर्वजणी आल्या होत्या. बाळाचं नामकरण विधी चालू होत, अर्थातच माझी जाऊ जिने आजपर्यंत माझं सगळं केलं तीच बाळाचं आताही सगळं करणार अशी माझी ही इच्छा होतीच. पण आमची काकी मधेच आली आणि म्हणाली वांजोट्या बाईने अशा कार्यात मध्ये मध्ये करायचं नसत. हे शब्द ऐकल्यावर माझी जाव तिने हातातलं सर्व तिथे ठेवलं आणि डोळ्यातील अश्रू आवरत रूममधे जाऊन बसली.

पण मी माझ्या काकीला चांगलेच सुनावले, माझ्या बाळावर माझ्यापेक्षा तिचा जास्त अधिकार आहे. तिने माझ्यासाठी आजपर्यंत खूप केले आहे, कोणतीही तक्रार नं करता, आणि आज नाही तर उद्या कधीतरी तिला होईलच बाळ, नाही झाले तरी हे बाळ आहे हे आमच्या घरातील सगळ्याचे आहे. त्याच्यावर सगळ्यांचा अधिकार आहे. मला माहित आहे माझ्या या बाळावर माझ्यापेक्षा जास्त जीव त्याची मोठी आईच लावणार आहे आणि त्याचे यापुढील सर्व कार्य तिच्या हातूनच होणार. कोणाला थांबायचे असेल त्यांनी थांबा ज्यांना हे आवडत नसेल त्यांनी जाऊ शकता.

बाळाचे मस्त पैकी नामकरण विधी झाले, त्याचे नावही जावे ने ठेवले, माझं बाळ आता मोठा झाला आहे आणि चांगला जॉबला लागला आहे. पण जॉबला लागल्यावर पहिला पेढा त्याने मोठ्या आईला भरवला, असे हे आमचे कुटुंब अजूनही तसेच आहे त्यांच्यातील प्रेम ही अजुन तसेच आहे तुमचे आहे का असे कुटुंब.

मी लिहिलेली ही कथा पण वाचा

लेखक : पाटीलजी

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल