Home कथा लॉक डाऊन असतानाही बाहेर फिरायला गेलो आणि रात्री खोकला ताप सुरू झाला

लॉक डाऊन असतानाही बाहेर फिरायला गेलो आणि रात्री खोकला ताप सुरू झाला

by Patiljee
1954 views
लॉक डाऊन

आज माझी तब्बेत थोडी खालावली आहे असे मला वाटले. पण साधा खोकला तर आहे वाटेल लगेच बरे. असे मनात धरून बेफिकीर राहिलो. अख्खा दिवस खोकला आणि रात्री संनसनुन ताप भरला आणि मनात भीतीचे सावट निर्माण झाले. मलाही त्या व्हायरस ने ग्रासले नसेल ना? अशी मनात सतत नकारात्मक विचार येत होते. कारण कालच मी मित्रासोबत बाईक वरून शहरामध्ये फेरफटका मारला होता. जाताना येताना दोघे तिघे मित्र ही भेटले होते. त्यांच्यासोबत आणखी काही लोक ही होती. पण काल माझ्या तितकं लक्षात नाही आले. आज मला नको त्या भीतीने ग्रासले होते.

इतकचं नाही पण घरात आल्यावर ही मी सगळ्यांसोबत नेहमी प्रमाणेच वागलो. माझे आई बाबा तर वयस्कर आहे आणि त्यांना ही लागण लगेच होऊ शकते. त्यामुळे माझ्या मनातील भीती अधिकच वाढली. खोकल्याचा औषध आहे की नाही ते पाहिलं तर कपाटात होत दोन चमचे औषध घेतले आणि गप्प अंगावर घेतले. पण झोप मात्र लागत नव्हती. इकडून तिकडून नुसता कुस बदलत होतो. पण झोप येत येत नव्हती. कशी येणार मनात सतत हीच चिंता मला ही व्हायरसचा संसर्ग झालाय का? आणि झाला असला तर माझ्या घरातल्यांनी होईल? अशी चिंता रात्रभर मनात घर करून होती.

रात्रभर हाच विचार मनात की मी दिवसभरात कोणकोणत्या स्पर्श केला आहे आणि मला काही झाले तर माझ्या म्हाताऱ्या आई वडिलांचे काय होणार? मी जर हे जग सोडून गेलो तर त्यांच्याकडे कोण बघणार? राहून राहून रडायला ही येत होते. शेवटी शेवटी पहाटे सहा वाजता मला झोप लागली. आठ वाजता आई उठवायला आली तेव्हा थोडे बरे वाटत होते. म्हणजे खोकला कमी झाला होता, पण तरीही मी आईला मला स्पर्श करू दिलं नाही. आईला समजेना मी असा का वागतो आहे आणि मी ही तिला काही सांगितले नाही. कदाचित तितकी हिम्मत माझ्या नव्हती.

दुसऱ्या दिवशी मी न राहून हॉस्पिटल मध्ये गेलो आणि माझी टेस्ट केली. आता टेस्टचा रिपोर्ट येणे बाकी होते. त्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो. पुन्हा खोकल्याचा औषध घेतले. कारण खोकला पुन्हा वाढला होता आणि माझ्या हृदयाची धडधडही आता जास्त वाढली होती. बाहेर पडायला भीती वाटत होती. माझ्यामुळे आणखी कोणाला संसर्ग नको आणि घरात ही मी तसाच वागत होतो. आई बाबांना जे समजायचे होते ते समजून गेले. आईच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. तर बाबा डोक्याला हात लावून बसले होते.

जेवण कोणाला गोड लागत नव्हते. गोड लागण्यासाठी जेवण ही करायची कोणाची हिम्मत नव्हती. आज माझा रिपोर्ट आला आणि तो निगेटिव्ह होता. रिपोर्ट पाहिल्यावर जीवात जीव आला. सगळं काही आठवल जे खोकला झाल्यापासून नको त्या शंका मनात धरून होतो. पण आता ही बातमी पहिल्यांदा आई आणि बाबांना द्यायला हवी ते काळजीत असतील, आणि हो आता जोपर्यंत सरकार सांगत नाही तोपर्यंत घरातून बाहेर पाय अजिबात ठेवणार नाही, मी तर नाहीच ठेवणार पण तुम्ही सुध्दा घरातच थांबा तेच आपल्यासाठी उत्तम आहे.

विचार करा फक्त शंकेने एवढे सर्व स्वतः सोबत घडू शकते तर खरंच असे काही झालं तर काय होईल? मित्रानो तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे जोपर्यत घरात बसायचे आहे तोपर्यंत बसा मग कितीही वेळ जाऊदे. काम काय आज उद्या मिळेल तुम्हाला पण तुमच्या घरच्यांना तुम्ही हवा आहात. त्यामुळे तुमचीही काळजी घ्या आणि घरच्यांची सुद्धा काळजी घ्या. सरकारच्या नियमांचे पालन करा.

ही एक काल्पनिक कथा आहे. वास्तवाशी त्याचा काहीएक संबंध नाहीये. जनजागृती साठी कथा लिहिली गेली आहे.

पाटीलजी

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल