आज मराठी सिने सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. एक दिग्गज अभिनेता काळाच्या पडद्याआड सर्वांना रडवून गेला. हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध अभिनेते अविनाश खर्शीकर ह्यांचं आज निधन झालं. ९० च्या दशकामध्ये आपल्या अनोख्या लुक मुळे ते प्रसिद्ध होते.
अविनाश खर्शीकर मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते म्हणून त्यांची सध्या ओळख आहे. पण याअगोदर त्यांनी चित्रपट सृष्टी आणि मराठी रंगभूमी तसेच मालिकाही मध्ये काम केले आहे. त्यांचा पहिला चित्रपट 1978 साली आला होता त्याचे नाव होते बंदिवान मी या संसारी. त्या नंतर त्यांनी आपली पाऊलवाट चालू ठेवली आणि या चित्रपट सृष्टीला अनेक चित्रपट दिले.
त्यांच्या काळी ते एक सुंदर असे दिसणारे अभिनेते होते. त्यांनी अनेक मालिकांमध्ये महत्वाचे रोल केले आहेत. माझा नवरा तुझी बायको, चालू नवरा भोळी बायको, बकुळा नामदेव घोटाळे, घायाळ, लपवाछपवी, माफीचा साक्षीदार हे चित्रपट केले होते आणि त्यातील त्यांची भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. लफडा सदन, सौजन्याची ऐशी तैशी, तुझं आहे तुजपाशी, दिवा जळू दे सारी रात इत्यादी नाटके करून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली होती.
अभिनेते अविनाश खर्शीकर यांची पहिली मालिका ‘दामिनी’ तुम्हाला आठवत असेलच यातील त्यांची भूमिका वाखडण्याजोगी आहे. आपल्या मराठी सिने सृष्टीत अनेक असे दिग्गज कलाकार होऊन गेले आहेत ज्यांना आताची पिढी विसता चालली आहे. त्यामुळे त्यांचे आजरामर सिनेमे आपण नक्कीच आपल्या मुलांना दाखवले पाहिजे तरच ते आपल्या मनामनात राहतील.
दिग्गज अभिनेते अविनाश खर्शिकर ह्यांच्या प्रमाणे अनेक असे अभिनेते आहेत ज्यांना आपण आपल्या आठवणीतून विसरत चाललो आहोत. आज त्यांच्या निधनाने आपण एक मोठी व्यक्ती गमावली आहे. आजची त्यांचे सिनेमे तुम्ही पाहिले तर त्या काळी असलेला त्यांचा लुक आणि अभिनय आताच्या मुलांना देखील कमी पाडेल. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.