अवधूत गुप्ते ह्याने आपल्या तालावर नाचायला आणि डोलायला प्रेक्षकांना भाग पाडले. असा हा नव्या पिढीचा गायक तसेच संगीतकार, चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक अशा अनेक कारणांमुळे ओळखला जाणारा हा अभिनेता म्हणजे अवधूत गुप्ते. याने लहान असल्यापासून मित्रांकडून शिकून शाळेत अनेक वाद्य ही वाजवले आहेत. ते वाजवण्यासाठी कोणते क्लासही लावलेले नव्हते पण मनापासून इच्छा असल्यावर सगळ्या गोष्टी आत्मसात करता येतात असे अवधूत गुप्ते यांचे आहे.
त्यांना नॉन वेज जास्त खायला आवडते. त्यातल्या त्यात फक्त गणेश चतुर्थी हा एकच उपवास वर्षातून एकदा त्याचा असतो. बाकी सर्व दिवस सारखेच. सकाळी चहासोबत पेपर वाचणे ही त्याला आवड आहे. त्याला दोन मुले आहेत शिवाय त्यांच्यासोबत वर्षातून दोनदा तरी बाहेरच्या देशात फिरायला जातात.
त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९७७ झाला आणि त्यानंतर जय जय महाराष्ट्र माझा’ आणि ‘बाई बाई मनमोराचा’ या दोन गाण्यांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान कायम केले. खुपते तिथे गुप्ते’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात ही आपल्याला अवधूत पाहायला मिळाला होता. एक मुलाखतकार म्हणून ही ओळखला जाऊ लागला. ‘विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती? म्हणजेच झेंडा’ या चित्रपटाच्या दिग्दर्शन ही याने केले आहे. त्यानंतर वैशाली सामंत ह्यांच्या सोबत त्यांनी बनवलेला ऐका दाजीबा हा इंडिपॉप अल्बम हा लोकांना खूपच आवडला होता.

अवधूत गुप्ते यांच्या आईवडिलांना त्यांचा मुलगा गायक होईल असे कधी वाटलेच नाही. इतर मुलांप्रमाणे अभ्यास करून डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. पण गायक होणे हा त्याच्या आतून मुरलेला होता आणि म्हणून तो गायक झाला. अवधूत बद्दल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने आतापर्यंत महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांची गाणी गायली आहेत.