आपल्या अभिनय आणि अदाकारीने नेहमीच तरुणाच्या गळ्यातील ताईत असलेली अभिनेत्री असीन सध्या तुम्हाला कुठेच दिसत नाहीये. ना ती कोणता सिनेमा करत आहे ना कोणती जाहिरात? आपल्या सोशल मीडियावर सुद्धा ती फारशी अॅक्टिव नसते. आमच्यासारखा तुम्हालाही हा प्रश्न नक्कीच पडला असेल की एवढा छान अभिनय करणारी अभिनेत्री अचानक अशी कुठे आणि का गायब झाली? ह्याचे उत्तर आपण ह्या बातमीत पाहणार आहोत. त्या अगोदर तिच्या सिनेमातील योगदाना विषयी जाणून घेऊया.
असीनचां जन्म २६ ऑक्टोंबर १९८५ मध्ये झाला. तिला पहिल्यापासून अभिनयात रूची असल्याने ती ह्या क्षेत्रात आली. मल्याळम, तमिळ आणि हिंदी सिनेमात तिने अनेक सिनेमात मुख्य भूमिका केली आहे. तिच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला आठ भाषा बोलता येतात आणि ज्या भाषेत ती काम करायची त्या मुविची डबिंग ती स्वतःच्या आवाजात करायची. क्वीन ऑफ कॉलीवूड म्हणून तिची ओळख साऊथ सिनेमात आहे.
२००८ मध्ये आलेल्या अमीर खानच्या गजिनी सिनेमातून बॉलिवूड मध्ये तिने पदार्पण केलं होतं. भारतातील ही अशी पहिली फिल्म बनली तिने १.९ बिलियन ची कमाई वर्ल्ड वाईड केली होती. ह्या सिनेमासाठी तिला बेस्ट डेबुट फिमेल फिल्म फेअर अवॉर्ड सुद्धा मिळाला आहे. ह्या नंतर ती सलमान खानच्या रेडी सिनेमात आपल्याला दिसली. ह्यानंतर हाऊसफुल २, बोल बच्चन, खिलाडी ७८६ सिनेमात सुद्धा काम केले. सिनेमात आपली पकड मजबूत होत असताना अचानक अशी बातमी समोर आली की असीन लग्न करतेय.

मायक्रोमॅक्स कंपनीचे को फाऊंडर राहुल शर्मा सोबत लग्न होणार? अशा बातम्या लोकांपर्यत येऊ लागल्या. अखेर जानेवारी २०१६ मध्ये असीन आणि राहुल ह्यांनी लग्न केले. लग्न झाल्यानंतर प्रसिद्ध असूनही तिने आपल्या सिने कारकिर्दीला रामराम ठोकला. तिचे संपूर्ण लक्ष सध्या आपल्या पतीच्या व्यवसायावर आणि मुलांवर आहे. मित्रानो तुम्हालाही असीनच्या ह्या निर्णयावर काय वाटतं आम्हाला नक्की कळवा? तिने अभिनय क्षेत्रात एवढं नाव असताना काम करायला हवं होत की कारकीर्द थांबण्याचा तिचा हा निर्णय योग्य आहे? तुमचे मत नक्की कमेंट द्वारे कळवा.