असीम रियाज ह्या नावाला कुणी ओळखत नसेल तर नवलच. बिग बॉसच्या २०१९ च्या पर्वात त्याने रसिक प्रेक्षकाच्या मनावर राज्य केले. भलेही त्याने ट्रॉफी जिंकली नसेल पण लोकांनी मने खूप मोठ्या प्रमाणात जिंकली. सर्वानाच वाटत होते असीम रियाज ने १३ वे बिग बॉसचे पर्व जिंकावे पण असे न घडता सिध्दार्थ शुक्ला ह्या पर्वाचा विजेता ठरला.
पण तरीसुद्धा घरातून बाहेर आल्यावर त्याचा चाहतावर्ग अजून वाढत गेला. जॅकलिन फर्नांडिस सोबत त्याला टी सीरिज सारख्या मोठ्या बॅनर खाली व्हिडियो अल्बम मिळाला तर अनेक इतर व्हिडियो अल्बम मध्ये सुद्धा काम केले. हे वर्ष जरी सर्वांसाठी त्रासदायक असले तरी असीम साठी खूप भाग्यशाली ठरलं आहे.
त्याने आताच आपली ड्रीम कार खरेदी केली आहे. खूप दिवसापासून त्याला हीच कार खरेदी करायची होती. त्यासाठी तो योग्य वेळेची वाट पाहत होता. पण आज त्याने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत आपण ती कार खरेदी केल्याची माहिती दिली आहे. BMW 5 सीरिज मधील M ही निळ्या रंगाची स्पोर्ट्स व्हेरिएशन खरेदी केली आहे.
पोस्ट केल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. ह्या BMW ची किंमत ६० लाख एवढी आहे. आपल्या मेहनतीच्या येणाऱ्या पैशातून घेतलेली पहिली कार खरंच मनाला एक वेगळे समाधान देऊन जाते.
ईयरबड्स शोधत आहात तर ह्या डीवाइसचा विचार करा. संपूर्ण दिवसभर चार्जिंग राहणारे ईयरबड्स