ह्या भयाण महामारी मुले अनेक लोकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. बरेच महिने घरी बसून राहिल्याने अनेकांच्या खिशात पैसे उरले नाहीयेत. अनेक कलाकार पुढे येऊन अशा लोकांची मदत करत आहेत. आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत ते अशा लोकांना आपल्या परीने जसे होईल तसे हातभार लावत आहेत. सोनू सूद चे नाव सुद्धा असेच सध्या चर्चेत आहे.
आज मराठी सिने सृष्टीतील एक दिग्गज चेहऱ्याने मराठी नाटक समूह आणि रंगभूमीवर काम करणाऱ्या लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. आपली सर्वाची लाडकी अभिनेत्री अश्विनी भावे ह्यांनी मराठी समूहाला २० लाखाची मदत केली आहे. एवढेच नाही तर मराठी रंगभूमीवर जे जे कलाकार पोटा पाण्यासाठी काम करत आहेत अशावर लॉक डाऊन मुळे वाईट परिस्थिती ओढावली आहे म्हणून त्यांचां पुढील चार महिन्यांचा खर्च त्यांनी उचलला आहे. पुढील चार महिने लागणारा खर्च त्या स्वतः स्वखर्चाने करणार आहेत.
आपल्या सिनेमात अभिनयाने छाप पाडणाऱ्या ह्या अभिनेत्री आज मात्र सर्वांचे मन जिंकले आहे. मराठी सिने सृष्टीतून त्यांच्या ह्या कार्याचे कौतुक होत आहे. अनेक मराठी कलाकारांनी सुद्धा आपल्या परीने सरकारला मदत केली आहे.
मार्च मध्ये जेव्हा लॉक डाऊन सुरू झाला होता तेव्हा प्रशांत दामले ह्यांनी सुद्धा रंगभूमी वरील कामगारांसाठी स्वखर्चाने मदत केली होती.