आज आपण अशोक सराफ ह्या दिग्गज अभिनेत्याच्या मुलाबद्दल बोलणार आहोत. तसेही आपल्याला माहीतच आहे की अशोक सराफ यांनी खूप सिनेमे गाजवले आणि त्यांच्या अभिनयाची तारीफ करावी तेवढी कमीच आहे. साधी सुधी नाही तर त्यांची कॉमेडी इतकी भन्नाट असायची की त्यांच्या विनोदावर चाहते पोट धरून हसायचे. पण आता त्यांनी सिनेमे बनवण्यात कल थोडा कमी केला आहे तुम्हाला वाटत असेल की अभिनेत्याचा मुलगा हा नेहमी एक कलाकार व्हायला पाहिजे पण ही गोष्ट साफ चुकीची आहे कारण या जगात प्रत्येकाची आवड निवड ही वेगवेगळी आहे तशीच अावड निवड या बाप आणि मुलाची ही आहे.
तर आपण बोलणार आहोत अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेत सराफ याच्याबद्दल. हा आभिनेता नाही परंतु एक उत्कृष्ट सेफ नक्की आहे. अनिकेत हा शाळेत असताना नाटकात काम करायचं म्हणजे तो नाटकात छोट्या मोठ्या भूमिका करत होता. कॅनडाच्या व्यावसायिक नाटकातून त्याने अभिनयास सुरुवात केली आहे. या नाटकात त्याने “ग्लिण्डा” हे पात्र साकारले आहे. महत्वाचा भाग म्हणजे या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन ही यानेच केले होते. शिवाय अनिकेत याला वेगवेगळ्या भाषा शिकायला आवडतात तसेच तो फ्रेंच भाषा अगदी उत्तम पणे बोलतो. याशिवाय कॅनडामध्ये तो इंग्रजी शिकावणायचे काम देखील करतो.

त्याला इंग्रजी कविता लिहायला खूप आवडतात तसेच त्याने एक हिंदी शॉर्ट फिल्म ही लिहली आहे. त्यातील गाणी ही स्वतः लिहून त्याला संगीतही त्याने स्वतः दिले होते. आज तो अभिनय, लेखन, दिग्दर्शन, शिक्षक, गीतकार यासोबतच एक उत्कृष्ट शेफ म्हणून आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या भूमिका उत्तमोत्तम बजावताना पाहायला मिळत आहे. या एका व्यक्तीमध्ये सेफ शिवाय ज्या गोष्टी एका कलाकार मध्ये असायला हव्यात त्यापेक्षा जास्त कलागुण यात ठासून भरलेले आहेत त्यामुळे हा कलाकार आयुष्य कधीच कोणत्या ठिकाणी कमी पडणार नाही हे ही दिसून येते.
वाचा मराठमोळा रजनीकांत कसा झाला सुपरस्टार, डोळे पाणावनारी जर्नी
अनिकेतच्या सेफ बद्दल बोलायचे झाल्यास तो एक उत्तम शेफ आहे. त्याला जेवण बनवायला आवडते. बालपणी आई निवेदिताला स्वयंपाक करताना बघून त्यालादेखील स्वयंपाकाची आवड निर्माण झाली. म्हणून तो एक उत्कृष्ट शेफ असून पाश्चिमात्य पद्धतीचे जेवण खूपच छान बनवतो. युट्युबवर ‘निक सराफ’ या नावाने त्याचे जेवण बनवतानाचे अनेक व्हिडिओ देखील आहेत. निवेदिता सराफ या सांगतात की मुलाने अभिनयाऐवजी शेफ म्हणून करिअर करावे, अशी माझी इच्छा होती. अनिकेतने माझी इच्छा पूर्ण केली आहे. वडील अशोक सराफ यांना अनिकेतच्या हातच्या ब्राऊनी खूप आवडते तर आई निवेदिताला अनिकेतने बनवलेला मार्बल केक आवडतो.