Home कथा अशक्य ही शक्य करतील स्वामी

अशक्य ही शक्य करतील स्वामी

by Patiljee
56541 views

माझे ग्रॅज्युएशन होऊन आज एक वर्ष झाला तरी मी बेरोजगार होतो. आमच्या तालुक्यात मी सर्वात जास्त गुणांनी दुसऱ्या क्रमांकावर होतो. पण कसे आहे ना आजकाल बुद्धी, गुण ह्यापेक्षा ओळख आणि पैस्याने कामे पटापट होतात. ह्या वर्षभरात खूप साऱ्या कंपनी, ऑफिस, प्लेसमेंट ऑफिस, आमदार खासदार ह्यांची घर गाठली पण कुठेच जॉबचे काही होत नव्हते.

माझ्या घरातली परिस्थितीही तशी हवी तेवढी चांगली नव्हती. बाबा तर तीन वर्षांपूर्वीच गेले. घरी आई आणि दोन लहान बहिणी, आई लोकांची घरकामे करून घर खर्च चालवते. बहिणी अजूनही शिकतात आणि मी एक वर्ष झाले असा बेरोजगार आहे. स्वतःचा खूप राग येतोय. असे आयुष्य नसलेले बरे, माझा मनाचा बांध तर तेव्हा सुटला जेव्हा एका कंपनी मध्ये इंटरव्ह्यू देऊन ऑफर लेटर हातात येऊन काही दिवसात कंपनीतून कॉल आला आणि सांगितले ती जागा तुम्हाला मिळू शकत नाही आमच्या मेनेजरच्या बहिणीच्या मुलाला तिथे रुजू केले आहे.

खरंच एवढा कमनशिबी असेल मी असे वाटले नव्हते मला म्हणून आज मनाशी निर्धार केला बस संपवाव हे सर्व, जीव द्यावा. रागा रागात डोंगराचे पायथे मी चढू लागलो. उंच डोंगरावरून दरीत उडी मारण्याचा निर्धार मी केला होता. खाली टोकावून पाहिले तर दरी खूप खोल होती. इथून उडी मारली तर माझी हाडे पण कुणाला मिळणार नव्हती. भीती तर वाटत होती पण आयुष्याचा कंटाळा आला होताच. त्या उंच टोकावरून उडी मारणार इतक्यात मागून मला एका आजोबांनी मागे खेचले.

अरे पोरा येडा बिडा झालास का तू? एवढ्या लवकर आयुष्याला कंटाळलास? अरे वय बी नाय तुझं मरण्याच? नको करुस लेकरा असे काही. काय करू मी आजोबा जगून तरी, हे जग मला जगुनही नीट देत नाहीये. मी माझ्यासोबत घडलेला प्रकार त्यांना सांगितला. त्याने मोठ्या धिरानी मला उत्तर दिलं पोरा आयुष्य हे एवढे सोपे वाटले का तुला? ह्यात अनेक गोष्टीत चढ उतार येत असतात. कधी यश तर कधी अपयश झोळीत पडणारच. आयुष्याचा जेवढा तू अनुभव घेशील तेवढी तुझी प्रगती होईल. आणि तुझ्या आईचा विचार तरी करायचा.

तू गेलास हे जग सोडून तर तुझ्या घरचे कुणाकडे पाहून आयुष्य जगतील? त्यांना घरातील कर्ता पुरुष हवा आहे तुझ्यासारखा भित्रा माणूस नकोय. काही लोक अपंग आहेत. कुणाला हात, कान, पाय, डोळे नाहीत तरी ते सुद्धा मेहनत करून आयुष्य जगत आहेत. तुझ्या सारखे पलकुटे नाहीत ते. त्या आजोबांचे बोलणे मला खरंच पटत होतं. मी माझा जीव देण्याचा निर्णय फक्त माझ्या बाजूने घेतला होता. मी गेल्यावर माझ्या कुटुंबाचे काय होणार हा विचार सुद्धा मी केला नव्हता.

तू गेलास हे जग सोडून तर तुझ्या घरचे कुणाकडे पाहून आयुष्य जगतील? त्यांना घरातील कर्ता पुरुष हवा आहे तुझ्यासारखा भित्रा माणूस नकोय. काही लोक अपंग आहेत. कुणाला हात, कान, पाय, डोळे नाहीत तरी ते सुद्धा मेहनत करून आयुष्य जगत आहेत. तुझ्या सारखे पलकुटे नाहीत ते. त्या आजोबांचे बोलणे मला खरंच पटत होतं. मी माझा जीव देण्याचा निर्णय फक्त माझ्या बाजूने घेतला होता. मी गेल्यावर माझ्या कुटुंबाचे काय होणार हा विचार सुद्धा मी केला नव्हता.

आजोबांचे मी मनापासून आभार मानले. बाबा तुम्हाला आजवर मी कधी पाहिले नाही. कोण आहात तुम्ही? अरे पोरा मी मागच्या आलीचा जनार्दन आहे ना त्याचा आजोबा, तू ओळखतो त्याला तुझ्याच शाळेत होता ना? हो हो बरोबर. धन्यवाद बाबा चला मी जातो घरी आता नक्की तुम्हाला कधीतरी भेटायला येईल. त्या दिवसापासून मी निर्णय घेतला होता की आता नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करेन.

खूप विचार केल्यानंतर मी कर्ज काढून दोन म्हशी विकत घेतल्या. तेव्हापासून माझे दिवस बदलले. माझा दुग्ध व्यवसाय खूप जोमात चालू झाला. दोन म्हशी नंतर माझा व्यवसाय वाढवत गेला. आज माझ्याकडे १६ म्हशी आहेत. तालुक्यातील दुकानात माझ्याकडचे दूध जाते. सर्व खर्च निघून एक लाख मी महिना कमावतो. माझा वडीलोपार्जीत व्यवसाय मी स्वीकारून स्वतःचे आयुष्य घडवलं.

ह्या सर्व व्यवसायात मी त्या बाबांना मात्र विसरून गेलो. बाजारात जाऊन त्यांना छान सदरा घेतला, पेढे घेतले आणि त्यांचे घर गाठले. जनार्दन आहेस का रे बाबा घरात? अरे महेंद्र तू आज इकडे कसा वाट चुकलास? अरे तुझ्या आजोबांना भेटायला आलो आहे. आज त्यांच्या मुले मी जिवंत आहे. मागच्या वर्षी मी जीव द्यायला त्या टेकडीवर गेलो होतो पण तुझ्या आजोबांनी मला समजावून माघारी धाडले. आज त्यांच्याच मुले मी यशस्वी शेतकरी आहे.

अरे महेंद्र असे कसे शक्य आहे. तू नीट पाहिलेस का? माझे आजोबा तर पाच वर्षांपूर्वीच हे जग सोडून गेले आहेत. अरे जनार्दन असे कसे शक्य आहे त्यांनी तर तुझेच नाव सांगितले मला. मला वाटतं महेंद्र तुला स्वामींनी वाचवले असणार. त्या टेकडीच्या पायथ्याशी स्वामींचे छोटे मंदिर आहे. स्वामींची लीला अघात आहे. त्यांनीच तुझा जीव वाचवला आणि तुला तुझ्या पायावर उभे केले. हे ऐकुन मला खरंच त्या क्षणाची जाणीव परत एकदा झाली. ते तेजस्वी रूप, तेच ते डोळे, चेहऱ्यावर वेगळ्याच प्रकारचा तेज. खरंच स्वामी तुम्ही होतात ते, हे सर्व आठवून माझ्या अंगावर शहारे येत होते. मनातून एकच आवाज येत होता अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामींची ही पण कथा वाचा

निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी.

तुम्हाला भयकथा वाचायला आवडतं असतील तर इथे नक्की भेट द्या. आम्ही तुमच्यासाठी खास फक्त आणि फक्त हॉरर कथांची साईट उपलब्ध करून दिली आहे.

लेखक : पाटीलजी

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल