आपण समोर साप पाहिल्यावर घाबरतोच मग तो विषारी असो किंवा बिनविषारी. त्याची ओळखच आपल्याला घाबरावयाला पुरेशी असते. सापाच्या काही जाती विषारी असल्यामुळे आपण त्यापासून आपला बचाव करतो. पण असे काही प्राणी आणि पक्षी ही या धर्तीवर आहेत जे विषारी साप खातात आणि त्या सापाच्या विषाच्या त्यांच्यावर कोणताच परिणाम होत नाही. हे प्राणी जगातील प्रत्येक ठिकाणी आढळतात असे नाही तर काहीच ठिकाणी ते आढळतात. पण यांच्यात असणारा हा गुण कमालीचा आहे.
हेजहोग( काटेदार उंदीर)
या जंगली उंदराच्या 70 प्रजाती आहेत. हा उंदीर युरोप, एसिया, नुझिलंड, आणि आफ्रिका या देशात पहिला जातो. याच्या अंगावर टणक अशी केस असतात. या प्राण्याला बघून तुम्हाला वाटणार ही नाही की हा इतका छोटा जीव एका मोठ्या प्राण्याची शिकार करू शकेल म्हणून हा प्राणी विषारी वायपार या सापाला मारून खाऊ शकतो, हा प्राणी जरी साप जास्त खात असला तरी किडे, बेडूक, पक्षांची अंडी, जांभूळ खरबूज, हे सगळं फस्त करतो. हा प्राणी सापाला फक्त खातच नाही तर या सापाचे विष ही या प्राण्याला काहीच करू शकत नाही.

हनी बेझर
भारत, आफ्रिका आणि आशिया या ठिकाणी पहिला जाणारा हा जीव अधिक भांडखोर मानला जातो. त्यामुळे त्याच्या वाटेत सहसा कोणताही प्राणी जात नाही. याच्या शरीराचा वरील भाग भुऱ्या रंगाचा असतो तर खालील भाग काळा असतो. याच्या पायाला धारदार नखे असतात. त्यामुळे तो बिल खोदण्यासाठी याचा वापर करतो. जीव साप या विषारी प्राण्याला काही मिनिटांत मारतो आणि त्याला पचवण्यासाठी फक्त 15 मिनिट लागतात.

केलिफोरणीया ग्राउंड स्क्वेरल
वेस्टर्न युनायटेड स्टेट मध्ये पहिला जाणारा हा सापाची शिकार अगदी सहज करतो. या प्राण्यांची मादा विषारी सापाला चाऊन खाते आणि आपल्या मुलांना ही देते खर तर साप हा या प्राण्याचा शिकारी आहे पण या प्राण्याने साप विरूद्ध लढण्यासाठी आपली इमुनी सिस्टिम मजबूत केली आहे.

मुंगूस
आपल्या देशात मुंगूस हा प्राणी सर्वानाच माहीत आहे. हा जीव विषारी सापाला ही मरून आपले भोजन करत असतो. मुंगूसच्या अंगावर असे आवरण असते की त्यामुळे सापाचा विषामुळे त्याचे रक्षण होते. जर सापाचा विष आणि चावने जास्त मजबूत असेल तर ते भरण्यासाठी काही तास लागतात. पण मुंगूस याने सापाला एकदा पकडले की त्याचा शेवट हा नक्की असतो.

द गार्डन डोअरमाऊस( उंदीर)
सगळ्याच उंदीर सारखा दिसणारा हा जीव पण त्याच्यापासून खूप वेगळा असा आहे. यांची लांबी 3.5 ते 5.9 इंच पर्यंत असते तर वजन 60 ते 140 ग्राम पर्यंत होतो. हा जीव जंगलामध्ये आपले वास्तव्य करतो. हा सपावर स्वतःहून हमला करत नाही पण सापाचा विष याच्यावर काहीच परिणाम करत नाही.
ऑपोसम
हा जीव एखाद्या उंदरासारखा आपल्याला दिसतो पण उंदीर आणि यांच्यात खूप फरक आहे. यांच्या रोजच्या आहारात मृत जनावरे, किडे, पक्षी याशिवाय फळ, अंडे, बेडूक इत्यादी हा जीव सापाला ही कधी कधी आपल्या आहारात घेत असतो. त्याला आपल्यावर येणाऱ्या धोक्याचा इशारा मिळतात तो एखाद्या मातीच्या पुतळ्या प्रमाणे स्तब्ध राहतो आणि आपल्या शरीरातून एक दुर्गंधी बाहेर सोडतो. त्यामुळे तो मृत पावला आहे असे सर्वानाच भासते.

द सेक्रेटरी बर्ड
आफ्रिकेच्या भागात पाहिला जाणारा हा दिसायला मोठा असा पक्षी आहे. हा पक्षी खूप मोठा शिकारी मनाला जातो आणि साप हा त्याचा रोजचा आहार आहे या पक्षाचे उंच आणि मजबूत असे पाय ज्यांच्या मुळे ती सापाला मारतो. किंवा हा पक्षी सापाला घेऊन उंच आकाशात भरारी मारतो आणि दगडावर आपटतो त्यामुळे त्याचं अन्न त्याला काही क्षणात मिळते.

तुम्हाला ह्यापैकी कुणाबद्दल अगोदरच माहीत होत आम्हाला नक्की कळवा.