पहिल्याप्रथम काही चुकले असेल तर क्षमस्व. आज मी ज्या व्यक्तीबद्दल बोलणार आहे. त्यांच्याबद्दल खरं तर बोलायची खूप इच्छा आहे पण सध्यातरी शब्द अपुरे पडतात. त्या व्यक्तीबद्दल बोलताना मनात जे काही अगोदरचे उने दूने होते. ते एका क्षणात मनातून बाहेर फेकले गेले. मी आज ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहे ते आहेत आपल्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे. खर तर या व्यक्तीला आपण सर्वच पहिल्यापासून ओळखतो आहोत. पहिल्यापासून म्हणजे आपले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते ना त्या दिवसापासून. पण त्यांच्यासारखी तेजस्वी कामगिरी मात्र उध्दव ठाकरे यांच्यात दिसली नव्हती. म्हणजे मला तरी त्यांच्याबद्दल तितकी चांगली गोष्ट कोणतीच वाटली नव्हती.
जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हाही ते इतकं काही आपल्या राज्यासाठी करतील अशीही शक्यता नव्हती, तेच काय माझा तर राजकारणावर अजीबात विश्वास नाही आहे. तशी त्यांच्याशी माझी काय जन्मोजन्मीची भांडणे नाहीत पण तरीही मनातून त्यांच्याबद्दल काहीच वाटत नव्हते. पण आज पहिल्यांदा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल मनात एक वेगळाच सन्मान निर्माण झाला आहे. कारण सध्याची परिस्तिथी बघता असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणे म्हणजे आपल्या राज्याचे नशीब आहे असे मी तरी समजतो.
या काळात या व्यक्तीने आपल्या राज्याची इतकी काळजी घेणे ही गोष्ट आपल्या लोकांसाठी खूप महत्त्वाची आहे. अगदी ज्या दिवसापासून आपल्या राज्याला या संकटाने घेरले आहे. त्या दिवसापासून मी रोज पाहतो आहे आणि त्यात मी उध्दव ठाकरे यांचे भाषण ही पाहिले. त्यांचे बोलणे म्हणजे अगदी हळुवार आणि कोणालाही न दुखावेल असेच होते आणि आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्याला अगदी आपल्या घरातल्या कुटुंबासारखं माननारे उध्दवजी खरंच जीवांच्या आकांताने लोकांना घरात थांबा असे सांगताना पाहिले आहे.
आपल्या राज्याबद्दल आणि त्यातील लोकांबद्दल पहिल्यांदा कोणा तरी मुख्यमंत्र्याला आपलेपणा आणि आपुलकी वाटत आहे. त्यामुळे मला तरी या माणसाबद्दल खूप सन्मान वाढला आहे. म्हणतात ना बाप तसा बेटा, आणि हेच आज श्री उध्दव ठाकरे जी यांनी करून दाखवले आहे. प्रत्येक तालुक्यात ते स्वतः फोन करून आपल्या आमदार, नगरसेवक, कार्यकर्ता ह्यांच्याशी बोलून तिथला आढावा घेत आहेत.

मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही की मला कोण आवडतो असे नाही. पण सध्या तरी मला ह्या व्यक्ती बद्दल मनापासून आदर वाढला आहे. ह्या लेखात अजुन एका व्यक्तीचे नाव मी आवर्जून उल्लेख करेल ते म्हणजे आरोग्यमंत्री राजेश टोपे. ह्यांची आई आजारी असताना सुद्धा ज्या प्रकारे ते परिस्थिती सांभाळत आहेत त्यासाठी त्याने आपण आभार मानले पाहिजे. हे लॉक डाऊन वैगेरे संपले ना की मी स्वतः ह्या दोघांसाठी आणि आपल्या सर्व डॉक्टर, पोलीस आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी एक दिवा नक्की लावेन.
तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल ते आम्हाला नक्की कळवा.