अर्जित सिंग म्हटलं की तरुणाच्या गळयातील ताईत. आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या गाण्यांनी नेहमीच त्याने युवा पिढीच्या मनात आपली जागा सर्वोच्च स्थानी तयार केली आहे. प्रेम म्हटलं की अर्जित सिंगची गाणी आणि विरह म्हटलं तरी अर्जित सिंगचीच गाणी हे जणू समीकरणच तयार झाले आहे. कोणत्याही सिनेमात त्याचे गाणे असले की लोकं त्याचे नाव पाहून ते गाणे ऐकतात किंवा मोबाईल मध्ये डाऊनलोड करतात. एक वेगळ्या प्रकारची क्रेझ त्याची निर्माण झाली आहे.
अर्जित सिंगने आतापर्यंत वेगवेगळ्या भाषेत २१२ गाणी गायली आहेत. पण आपल्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे की अर्जित चे पहिले वहिले मराठी गाणे प्रदशिर्त झाले आहे. व्हॅलेंटाईन विकच्या शुभ मुहूर्तावर सलते ह्या गाण्याचे ऑडियो लाँच करण्यात आले आहे. हे गाणे ऐकताना मन प्रफुल्लित होऊन जातं. रोजच्या जीवनातील गरजा भागवताना आपण आपल्या इच्छा आकांक्षा कशा मारून जगतो ह्याचे उदाहरण गाण्याच्या शब्दात तुम्हाला पाहायला मिळेल.
सलते हे गाणे सुबोध भावेच्या आगामी भयभीत ह्या होरर सिनेमातील आहे. ह्या सिनेमाचे दिग्दर्शन दीपक नायडू ह्यांनी केले आहे. तर सिनेमात तुम्हाला सुबोध भावे, मधू शर्मा, पूर्वा घोखले, मृणाल जाधव, गिरिजा जोशी आणि यतीन कार्येकर पाहायला मिळतील. नकाश अझीझ ह्यांनी ह्या सिनेमाला संगीतबद्ध केले आहे. तर ह्या गाण्यांचे लिरिक मंदार चोळकर ह्यांनी लिहिले आहेत.
सलते हे गाणे अर्जितच्या आवाजात ऐकणे म्हणजे आपल्यासाठी एक उत्तम मेजवानी आहे. तुम्ही हे गाणे ऐकले तर परत परत ऐकाल असेच गाणे आहे. ह्या आधी सुद्धा अर्जित सिंग ने मराठी सिनेमा कट्यार काळजात घुसली ह्या सिनेमात सुद्धा गाणे गायले आहे पण ते गाणे भोळा भंडारी हिंदी मधेच होते.