Home करमणूक अण्णा नाईक म्हणजे माधव अभ्यंकर हे भुमिकेपेक्षा खूप वेगळे आहेत वाचा त्यांचं खरं आयुष्य

अण्णा नाईक म्हणजे माधव अभ्यंकर हे भुमिकेपेक्षा खूप वेगळे आहेत वाचा त्यांचं खरं आयुष्य

by Patiljee
372 views

मित्रानो आपल्याला पैकी किती लोकांना भयकथेवर आधारित अश्या सीरियल बघायला आवडतात तर यापैकी बरेच जण असतील ज्यांना अशा मालिका आवडतात. जरी काही लोकांचा असल्या गोष्टीवर विश्वास नसला तरी पण या सीरियल आपण बघतोच बघतो. अशीच एक मालिका आहे रात्रीस खेळ चाले. यातील सर्वात महत्त्वाचे आणि प्रसिद्ध झालेले कॅरेक्टर म्हणजे अण्णा भाऊ जरी यांची भूमिका ही यामध्ये एखाद्या व्हिलेन सारखीच आहे पण तरीही हा व्यक्ती या भूमिकेतून लोकांच्या इतका पसंतीस उतरला आहे की बस रे बस. खूप छान अभिनय केला आहे या कलाकाराने.

पण हा अभिनेता मुळात आहे तरी कसा आणि कशाप्रकारे या सीरियल मध्ये यांचे पदार्पण झाले हे तुम्हाला माहीत नसेल कदाचित. तर रात्रीस खेळ चाले या सीरियलचे दोन भाग आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या भागात अण्णाची भूमिका अगदी थोडी होती त्यानंतर दुसऱ्या भागात आपल्याला या अण्णा नाईकाची भूमिका ही या सीरियल मधील सर्वात महत्त्वाची आहे. त्यांची भूमिका पाहून लोकांना खूप चीड येते पण ते स्वाभाविक आहे कारण जेवढी लोकांची रिएक्शन जास्त तितका हा अभिनय लोकांच्या मनापर्यंत पोचला असे समजायचे. यांच्या सोबत शेवंता म्हणजे अपूर्वा नेमळेकर हीची ही भूमिका उठावदारपने या सीरियल मध्ये आपल्याला दिसून येते. तर या भूमिकेसाठी अण्णांना खूप जास्त मेहनत घ्यावी लागली ते आपल्याला सीरियल मध्ये दिसून येतेच आहे.

माधव अभ्यंकर सांगतात की त्यांच्या या भूमिकेमुळे काही लोक त्यांच्याजवळ यायला सुद्धा घाबरतात तर अण्णा यांना कोणती मेहनत घ्यावी लागली ते सांगतात की त्यांना पहिले तर मालवणी भाषा येत नव्हती. ती भाषा पहिली शिकावी लागली त्यासाठी मालवणी नाटके पाहा, अशी सूचना त्यांना निर्माता-दिग्दर्शकांनी केली होती. मग, त्यांनी टीव्हीवर, ऑनलाईन अनेक नाटके पाहिली. जवळपास एक महिनाभर त्यांना भाषेचा सराव करावा लागला, असे माधव अभ्यंकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यानंतर त्यांचं वजन हे या कॅरेक्टर साठी थोड जास्त होत त्यामुळे त्यांना एका महिन्यात सुमारे सात ते आठ किलो वजन कमी करायचे होते ते ही त्यांनी खूप मेहनतीने केले.

मूळचे पुण्याचे असणारे माधव अभ्यंकर यांनी जरी या सीरियल मध्ये नकारात्मक भूमिका साकारली असली तरी मुळात त्यांचा स्वभाव यापेक्षा खूप वेगळा आहे मनाने खूप भावनिक आहेत शिवाय खऱ्या आयुष्यात नात्याला जास्त महत्त्व देतात ‘जगावेगळी अंत्ययात्रा, तुकाराम, चिरगुट, ध्यानी मनी, विश्वविनायक, सेकंड इनिंग यांसारख्या चित्रपटात त्यांनी काम केले आहे.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल