अंकुश चौधरी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये नावाजलेला अभिनेता तर आहेच पण त्याची दिलखेच अभिनय पाहून भके भले घ्यायला झाले आहेत. दुनियादारी मधील दिगंबर शंकर पाटील असो किंवा क्लासमेट मधील सत्या तुम्ही पहिलाच असेल प्रत्येक भूमिकेत आपले वेगळेपण सिद्धकरणारा हा अभिनेता आपल्या लव लाईफ मध्येही तितकाच वेगळा आहे. अंकुश याने हिंदी सिनेमा मध्येही आपले नशीब आजमावले होते. त्याचबरोबर अनेक मराठी चित्रपटात त्याचे काम वाखडण्याजोगे आहे.
त्यातील यंदा कर्तव्य आहे, चेकमेट, डबलसीट, ती सध्या काय करते, दगडी चाळ, माझा नवरा तुझी बायको आणि आताच प्रदर्शित झालेला ट्रिपल सिट आणि धुरळा सिनेमा लोकांच्या खूप पसंदी पडला आहे. ह्या सिनेमांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. अंकुश आणि त्याची पत्नी दीपा यांच्या लग्नाला जवळ जवळ 12 वर्ष झाली म्हणजे त्यांचे लग्न हे 2007 या वर्षी झाले होते. या दोघांची लवस्टोरी ही तितकीच इंटरेस्टिंग आहे तुम्हाला वाचायला आवडेल अशी लवस्टोरी.

अंकुश आणि दीपा हे दोघेही एकाच कॉलेज मध्ये शिकायला होते. महर्षी दयानंद या कॉलेज मध्ये त्या दोघांची मैत्री आणि त्यानंतर प्रेम झाले. जसं सर्वाचे होते तसेच कॉलेज मध्ये असल्यापासूनच त्या दोघांनाही अभिनयाची खूप जास्त आवड होती. त्यामुळे कॉलेज मध्ये असल्यापासून नाटक आणि एकांकिका यामध्ये दोघांनीही काम केले आहेत. दोघांमधील जवळीक अधिक वाढत गेली आणि त्यांनी २३ नोव्हेंबर 2006 साली आपला साखरपुडा उरकला. दीपा हिने ही खूप सीरियल मधून हिंदी आणि मराठी मधून काम केले आहे. अनेक सिनेमा मध्ये ती आपल्याला दिसली होती.
जवळ जवळ एकमेकांच्या प्रेमात अडकल्यानंतर त्यांनी तब्बल 10 वर्षांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघे त्यांच्या संसारात प्रचंड खूश असून त्यांना प्रिन्स नावाचा मुलगा देखील आहे. दिपा परब आपल्याला अनेक जाहिरातींमधून भेटते तसेच अनेक सिनेमामधील तिचे काम बघण्यासारखे आहे.