अंकुर वाढवे जरी एक अभिनेता म्हणून आपल्याला माहीत असला तरी तो खूप चांगला कवी आहे. त्याला प्रेम कविता लिहायला आवडतात. उन्हात प्रेम गीत गाण्यासाठी हा त्याचा कविता संग्रह आताच प्रदर्शित झाला आहे. पहिल्यांदा त्याला एका नाटकात काम करण्याची संधी मिळाली होती. त्यात संजय नार्वेकर हे ही होते. त्यानंतर त्याने अजुन अनेक नाटकं मध्ये केले आहे, करून गेली गावी, गाढवाचं लग्न, सर्किट हाऊस, आम्ही सगळे फर्स्ट क्लास, सायलेन्स आणि कन्हैया यांसारख्या लोकप्रिय नाटकामध्ये त्याने काम केले आहे.
जलसा आणि गावठी या मराठी चित्रपटामध्ये ही त्याने काम केले होते. त्यानंतर चला हवा येऊ या या शो मध्ये ती आपल्याला दिसला. या शो मध्ये काम करणारे अनेक विनोदवीर यांच्या बरोबरीला राहून काम करण्याची धमक या अभिनेता मध्ये आहे. कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, भाऊ कदम आणि श्रेया बुगडे हे चला हवा येऊ द्या या शो मधील अभिनेते विनोद करून प्रेक्षकांचे धम्माल मनोरंजन करण्यात त्यांनी तर शिखर गाठले आहे.
त्यांच्या पायावर पाय ठेवत अंकुरने या कलाकाराने सुद्धा प्रेक्षकांना तितकेच हसवले आहे. या शो च्या अगोदर त्याने खूप नाटके केली. पण खरी प्रसिध्दी आणि लोकप्रियता त्याला चला हवा येऊ द्या या शो ने दिली. आता त्याला लोक अभिनेता म्हणून ओळखू लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याने आपल्यासाठी एक गाडी घेतली आहे स्वतच्या मेहनतीच्या पैशातून गाडी घेतल्याचा आनंद सर्वानाच असतो त्यालाही खूप आनंद झाला आहे.

शिवाय याच दरम्यान गेल्यावर्षी त्याने आपल्या लग्नाचा बार फोडला. कोर्ट मॅरेज करून त्याने आपले लग्न पार पडले आणि त्याने आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.