आपल्याला अगदी लहान असल्यापासून सांगण्यात येतं, ‘रोज अंघोळ केली पाहिजे’, ‘शरीर स्वच्छ तर मन स्वच्छ ‘. रोज अंघोळ केल्यावर किती ताजं तवानं वाटतं आपल्याला. पण खरच रोज अंघोळ करायची गरज असते का? खर तर रोज अंघोळ करण्याची गरज नसते आणि त्यामागे तशी कारणं देखिल आहेत, आणि आपण रोज अंघोळ का करायला लागलो याची देखिल.
पूर्वीच्या काळी लोक रानावनात, धूळ, माती मधे काम करायचे आणि त्यामुळे त्यांच्यासाठी रोज अंघोळ करणं गरजेचं होतं. पण आता तशी परिस्थिती राहिली नाही, आता जास्तीत जास्त लोक एका जागी बसून, एखाद्या बंद ठिकाणी काम करतात, त्यांना कष्टाची काम करावी लागत नाहीत त्यामुळे त्यांना रोज अंघोळीची गरज नसते.
रोज अंघोळीची सवय लागली ती म्हणजे स्वस्त मिळणाऱ्या साबणामुळे, साबण स्वस्त मिळू लागला आणि त्यामुळे लोक रोज अंघोळ करू लागले. पण रोज अंघोळ करणे हे आरोग्याच्या दृष्टीनेदेखिल हानिकारक आहे. रोज अंघोळ केल्याने आपल्या शरीरातील जे नेसर्गिक तेल आणि ओलावा असतो तो हळू हळू निघून जातो आणि त्यासोबत आपल्या त्वचेमध्ये असणारे चांगले जिवाणू देखिल.
जे आपली रोग प्रतिकारक शक्ती टिकवून ठेवू शकतात आणि खूप साऱ्या त्वचेच्या रोगांपासून देखिल वाचवतात. आता राहता राहिला प्रश्न, रोज अंघोळ न केल्यामुळे येणाऱ्या दुर्गंधीचा. तर सुरुवातीला थोडी दुर्गंधी येणार मात्र जेव्हा शरीराला रोज अंघोळ न करण्याची सवय लागेल तेव्हा हळू हळू शरीराचे तेल उत्पादन कमी होईल आणि दुर्गंधी देखिल जाईल.
कारण आपले पाय, काख आणि आपल्या शरीराचे खाजगी भाग हे दुर्गंधी निर्माण करतात आणि त्यासाठी रोज अंघोळ करायची अगदीच गरज नाही. रोज अंघोळ न करण्यासाठी आणखी एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे आपण पाणी वाचवू शकतो आणि आपल्या पर्यावणाची काळजी घेऊ शकतो.
शेवटी स्वच्छतेच्या बाबतीत प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गरजा असू शकतात, प्रत्येकाची निवड असते, प्रत्येकाचे मत असू शकते. जर तुमचे काम कष्टाचे नसेल, एका जागी बसून करायचे असेल तर रोज अंघोळीची गरज नाही. फक्त रोज हात, पाय, तोंड धुऊन गेलात तरी चालून जाईल.
हे पण नक्की वाचा रोज न चुकता पाण्यात हळद मिसळून प्या, मिळतात हे अगणित फायदे