अमृता खानविलकर हिने आता बॉलिवुड मधील आपले जम बसायला सुरुवात केली आहे. तशी तिची राजी मधील भूमिका सगळ्याच प्रेक्षकांना आवडली होती. त्यातील तिची भूमिका ही खरंच वाखाडण्याजोगी होती. पण आता ती बॉलिवुड मधील एका नवीन चित्रपटांमधून आपल्या सर्वांच्या भेटायला येत आहे. त्यासाठी खरचं मराठी प्रेक्षक ही तिच्या या सिनेमाची अगदी प्रकर्षाने वाट पाहत असतीलच. चला बघुया ती आता आपल्यासाठी नवीन काय घेऊन येत आहे.

अमृता खानविलकर ही आता बॉलिवुड मधील ‘मलंग’ या नव्या सिनेमातून आपल्याला दिसणार आहे. यामध्ये अनिल कपूर आणि कुमाल खेमु यांच्यासह आदित्य रॉय कपूर, दिशा पटाणी यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. तर हा चित्रपट करण्यासाठी अमृता हिने आपले वजन 12 किलो कमी केले आहे. हा सिनेमा एक प्रेमकथा आणि ऍक्शन ने परिपूर्ण भरलेला असणार आहे. ह्या सिनेमाच्या ट्रेलर मधील आदित्यच्या लूक आणि बॉडी चे सर्व कडून जोरदार कौतुक होत आहे.
ह्या चित्रपटाचा ट्रेलर हा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा आहे तसेच हा सिनेमा ७ फेब्रुवारीला सिनेमा थिएटर आपल्याला भेटायला येणार आहे. चित्रपट पाहिल्यावरच आपल्याला कळेल की यातील अमृता खानविलकरची नेमकी भूमिका काय आहे आणि हा चित्रपट खरोखर प्रेक्षकांच्या आवडीस उतरतोय का? काही दिवसाने अमृता कलर्स वाहिनीवरील खतरों के खिलाडी मध्ये सुद्धा आपल्याला दिसेल. ह्या रिऍलिटी शो ची शूटिंग अगोदर पूर्ण झाली आहे फक्त प्रक्षेपण बिग बॉस संपल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल.