आमच्या सोसायटी मधील ही गोष्ट आहे. तेव्हा मी लहान होते लहान म्हणजे जेमतेम दहावीला असेन पण मला तरीही सर्व लक्षात आहे. कारण त्यावेळी जे घडले ते विसरण्यासारखे मुळीच नव्हते. त्यामुळे मरेपर्यंत तरी मी ती गोष्ट अजिबात विसरू शकत नाही. त्यावेळी माझे बाबा एका कंपनीमध्ये मॅनेजरच्या पोस्ट वरती कामाला होते आम्हाला तशी पैशाची कमतरता नव्हती पण तरीही माझे बाबा खूप कष्ट करायचे. जितके होईल तितके काम करायचे आणि म्हणून त्यांना कधी कधी कंपनी मधून घरी यायला उशीर व्हायचा.
त्या दिवशी ही माझ्या बाबांना उशीर झाला होता पण ती रात्र इतर रात्रीं पेक्षा वेगळी होती.. वेगळी म्हणजे पुढे वाचा मग तुम्हाला कळेलच.. त्या दिवशी अमावस्या होती ती सुध्दा काव काव अमावस्या, सकाळी आईने आमच्या आजोबांना घास ठेवला होता. सकाळी बाबा ही होते पण ते त्या दिवशी उशिरा कामावर गेले होते आणि आज नेमका त्यांना उशीर होणार होता. पण कामावर जाताना आई त्यांना म्हणाली होती अहो आज लवकर या जास्त उशीर करू नका, आज आमावाशा आहे. माझे बाबा तेवढ्यापुरती हो म्हणाले आणि निघून गेले.
पण नेमका त्या रात्री माझ्या बाबांना यायला उशीर झाला. आमचं घर त्यांच्या कंपनी पासून जास्त लांब नव्हत फक्त ३० मिनिटातच अंतर होत. बाबांनी बाईक काढली आणि निघाले थोड्या वेळात त्यांना आमच्याच बिल्डिंग मधील काका भेटले कारण ते नेहमीच भेटायचे. तिथेच त्यांची कंपनी होती आणि आमचे बाबा घरी येताना कधि कधि त्या काकांना ही सोबत आणायचे आणि म्हणून आज ही ते बाबांच्या सोबत होते. माझे बाबा पुढे आणि ते काका पाठीमागे बसले होते. दोघे मस्त बोलत चालले होते पण मधित कुत्री भूंकायला लागली आणि ती सुधा बाबांच्या गाडीकडे बघून भुंकत होती.
बाबा त्या कुत्र्यांना हाकळत होते पण ते जोरजोरात बाबांकडे बघून भुंकत होते. शेवटी बाबांनी बाईक जोरात सुरू केली आणि तिथून निसटले बाबा आणि ते काका सोसायटीमध्ये पोचले पण त्या रात्री ते काका नेहमीसारखे वाटले नाही. म्हणजे नेहमी गाडीवरून उतरले की, काय जेवलात का? काय करता असे प्रश्न असायचे पण त्या रात्री त्यांनी आमच्याकडे धड पाहिले ही नाही आणि तडक आपल्या रूम कडे निघाले त्यांची रूम आमच्या रूमच्या वरती होती. ते वर जात होते आणि आम्ही त्यांच्याकडे फक्त पाहत होतो.
सकाळ झाली आणि आमची आई आम्हाला उठवायला आली म्हणाली अहो ते वरचे काका वारले म्हणे, त्यांना अटॅक आला. अग पण कालच तर ते माझ्यासोबत व्यवस्थित आले आणि काही टेन्शन आहे वैगेरे असे काहीच वाटले नाही.. तुम्ही बोलता ते ठीक आहे पण काकू म्हणाल्या काल ते कामाला गेलेच नव्हते आणि रात्रीचं त्यांना अटॅक आलाय सांगतात. अग काय बोलतेस काय कालच ते माझ्या सोबत बाईकवर बसून आले तू बघितले ना.. हो पण काल अमावस्या होती हे विसरून चालणार नाही. हे ऐकुन आमचे बाबा चक्कर येऊन पडले.
तासाभराने शुध्दीवर आले पण तापाने फण फणले होते आमच्या आईने लगेच जाऊन मंदिरातील पुज्याऱ्या कडून अंगारा आणला, घरी डॉक्टरांना बोलवले, तेव्हा कुठे बाबांचा ताप उतरला. पण त्या दिवसापासून बाबांनी रात्रीची ड्युटी करणे सोडून दिले.
लेखक : पाटीलजी आवरे उरण, रायगड