Home Uncategorized हॉलिवूड चे भन्नाट चित्रपट आणि त्यांचे हादरून टाकणारे शेवट

हॉलिवूड चे भन्नाट चित्रपट आणि त्यांचे हादरून टाकणारे शेवट

by Patiljee
945 views

चित्रपट पहायचे ठरल्यास आपल्या आवडत्या कॅटेरगरी चे चित्रपट पाहिल्यास नक्कीच प्रेक्षकांना आवडते आज आपण अशाच काही भांनाट चित्रपटांविषयी जाणून घेणार आहोत ,तुम्हाला पाहायला नक्की आवडतील असे हॉलिवूड सोबत तामिळ आणि मराठी हिंदी चित्रपट ही यात दिसतील.. आपल्याला वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट पाहायला आवडतात का असे काही चित्रपट ज्यांचा शेवट फारच विचित्र आणि हादरवून टाकणारा असेल तर हा लेख तुमच्यासाठी. काही विस्मयकारक चित्रपट पाहताना तुम्हाला नक्कीच मजा येईल. त्याचबरोबर काही निवडक चित्रपट survival movie कॅटेरगरी मधले ही तुम्हाला पाहता येतील त्याची माहिती ही खाली दिलेली आहेच.

तुम्हाला ही चित्रपट पाहायला आवडत असेल तर नक्कीच हे  हटके चित्रपट  तुम्ही ट्राय करायला पाहिजे. खर तर हॉलिवूड च्या चित्रपटा पुढे किंवा कोरियन चित्रपटा पुढे भारतीय चित्रपट हे फार दुबळे आहेत.पण असे काही चित्रपट आहेत कि जे ज्याचा शेवट खूपच हादरवून टाकणारा वाटला.

चित्रपट

  • गुना 369 (तेलगू चित्रपट)-

 मुलीच्या कामजोराचा फायदा घेऊन मुलींचा बलात्कार करणारी टोळी आणि आपलं हिरो कसा त्या टोळीच्या संपर्कात येतो.आणि शेवटी त्याला काय काय गमवावं लागत याच्यवर सर्व चित्रपट आहे. पण याचा शेवट मात्र मनाला खूप disterb करून टाकतो.हिरोने गुन्हेगारांना केलेली शिक्षा पाहून छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आपल्याला होते.आणि नकळत आपल्या डोळ्यात पाणी येते.

  • मुंबई पोलीस (मल्याळम चित्रपट)-

पोलीस मधे असलेले वरिष्ठ 3 अधिकारी कि जे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत आणि त्यात एकाच खून होतो.या खुनाचा तपास पूर्ण करून दुसरा मित्रा परतत असताना त्याचा असिसिडेन्ट होतो व तो आपली स्मृती गमावून बसतो.मग त्याला आपली आयडेंटिटी शोधन भाग पडत. मग तो कसा हे सगळं करतो या वरती हा चित्रपट आहे.अचंबित करणारा या चित्रपटा चा शेवट खरंच मनाला खुश करतो.

  • थडम

हा चित्रपट बघताना तर सस्पेन्स वाढत जातो पण ह्याचा शेवट पण आश्चर्यकारक आहे .प्रेक्षकांना अचानकपणे झालेला शेवट पचवायला काहीसा अवघड जातो.

  • द अदर्स

एक आई आपल्या मुलांसोबत राहते एका जुनाट वाड्यात. पण त्यांना त्रास होतोय तिथे येणाऱ्या आगंतुक पाहुण्यांचा. हे खरे पाहुणे कोण? या सर्वांवर आधारित अशी एक कथा पुढे सरकते नि शेवट तर अगदीच अनपेक्षित एकदा नक्की पहावा असा चित्रपट.

  • अरुवी

हा चित्रपट ही फारच असच काहीसा उत्सुकता वाढवणारा चित्रपट मधेच अचानक पणे नवीन ट्विस्ट  देवून जातो. पाहताना मात्र मजा येऊन जाते.

  • फॉरगोटन (forgotten ) –

ह्या प्रश्नाला एकदम फिट बसणारा चित्रपट ..म्हणजे हा ह्याचा शेवट आश्चर्यकारक तर आहेच ..पण चक्रावून टाकणारा हा चित्रपट नक्कीच पहावा..

  • ऑर्फन

एका मनोरुग्ण असलेल्या छोट्या मुलीभोवती ही कथा फिरत राहते, शेवट मात्र आश्चर्यकारक ठरतो. प्रेक्षकांना खिळवुन ठेवण्यात चित्रपट यशस्वी होतो.

  • डेड सायलेन्स

एक असा भयपट ज्यात आहे बोलणाऱ्या कळसूत्री बाहुल्यांचा जीवघेणा खेळ. बघताना प्रेक्षकांच्या मनात धडकी भरून जाते. शेवट ही तसाच विस्मयकारण होतो.

  • द सिक्स्थ सेन्स

मृतात्मे दिसणाऱ्या लहानग्याला मदत करणारा एक मनोचिकित्सक. दोघांच्या कथेत रमून जाणार प्रेक्षक खरं काय ते फक्त त्या छोट्यालाच ठाऊक असलेली ती गोष्ट पाहण्यात मजा येऊन जाते. शेवट ही भलताच अनपेक्षित घडतो.

  • द अदर्स

एक आई आपल्या मुलांसोबत  एका जुनाट वाड्यात राहत असते, तिथे घडणारी ही गोष्ट , त्यांना तिथे येणाऱ्या आगंतुक पाहुण्यांचा त्रास होतोय यात गोष्ट पुढे सरकते, हे खरे पाहुणे कोण? आणि यांची कथा खिळवुन ठेवते, शेवट ही असाच पाण्यासारखा ठरतो.

  • सायको (psycho)

ग्रेट सस्पेन्स चित्रपट आणि हा पण नक्कीच आश्चर्यकारक शेवट च्या यादीत बसतो. सस्पेन्स चा पुरेपूर वापर यात कलेला दिसतो. प्रेक्षकांना पाहताना उत्सुकता लागून राहते की पुढे काय होणार. उत्सुकतेने भरलेला आणि मनाला चटका लावून जाणार शेवट.

  • इन साईड मॅन

बॅन्क लूटेपासून सुरू होणारी गोष्ट आणि पोलिस आणि एक वॉल स्ट्रीट ब्रोकर अश्या पध्दतीने पुढे सारकणारी गोष्ट उत्सुकता वाढवत जाते. एकदा नक्की पहावा असा विस्मयकारक शेवट असलेला चित्रपट.

कोरियन चित्रपट

  •  ‘ मेमोरिज ऑफ मर्डर ‘ –

एका अज्ञात गुन्हेगाराने बलात्कार करून अनेक तरुण मुलींची हत्या केल्याच्या प्रकरणात तपास दोन गुप्तहेर करीत आहेत. अ‍ॅंडीला पत्नी आणि तिच्या प्रियकर यांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात सलग दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे आणि त्याला कठोर कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. केवळ अँडीला माहित आहे की त्याने हे गुन्हे केले नाहीत. तेथे असताना, तो रेड (मॉर्गन फ्रीमन) बरोबर मैत्री करतो, तुरुंगातील जीवनाचा क्रूरपणा अनुभवतो, 19 वर्षांत वॉर्डनला मदत करतो इत्यादी. चित्रपटाचा शेवट हादरवून टाकणारा आहे. ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी नक्की पहावा

  • शटर ईसलँड –  shutter island

मार्शल टेडी डॅनियल्स आणि त्याचा एक जोडीदार चक शटर आयलंड येथे प्रवास करून तेथील रेशेल सोलॅंडोच्या बेपत्ता होण्याच्या तपासणीसाठी येतात. तिने आपल्या तीन मुलांना बुडवल्यामुळे तिला एश्क्लिफ रुग्णालयात धोकादायक गुन्हेगारांसाठी संस्थेत विभागण्यात आले होते. टेडी ने ही आपल्या पत्नीला आणि मुलांना गमावलेले असते. गुंतागुंतीचा आणि रहस्यमय असा हा चित्रपट .

  • मराठी चित्रपट सैराट

हा चित्रपट ह्या लिस्ट मध्ये फक्त ह्या चित्रपटाच्याएकदम शेवटच्या सीन मुळे टाकला, ह्यातला एकदम शेवटचा सीन खूपच आश्चर्यकारक आहे ..कुणी विचारच नाही करणार असा शेवट. त्याच बरोबर खाली दिलेले काही सिनेमे ही विचित्र शेवटाबरोबर संपतात. 1. द विजिट ( The visit ), 2. द स्केलिटन की (The Skeleton Key ), 3 कहानी ( kahaani ), 4. द सायलेन्स ऑफ द लैम्ब (The Silence of the Lambs), 5-  सॉ ( saw), 6  गेट आउट ( get out ), 7. सेवन ( seven )

याच बरोबर डोकं शांत ठेऊन पाहण्या सारखे

फाईट क्लब

१९९९ चा ब्रॅड पिट चा चित्रपट. प्रत्येकाने सर्व कामे बाजूला ठेवून डोक्यावर कोणताही ताण न ठेवता शांतपणे बघावा असा हा चित्रपट. अजूनही ह्या चित्रपटाची टॉप टेन मध्ये गणना होते.

 पाहण्यासारखे   चित्रपट ( sarvival movie)

1 – लाईफ ऑफ पाय  Life of Pi, 2012

यात पाय नावाच्या मुलाची कथा पाहायला मिळते, कुटूंबासोबत परदेशी निघालेला पाय  जहाच्या अपघातातून वाचतो आणि त्यांची स्वतःला जिवंत ठेवण्याची धडपड पाहण्या सारखी आहे. सर्वाईवल movie मध्ये हा चित्रपट पहिल्या स्थानावर येतो.

2-  172 हावर्स   127 Hours, 2010

2010 मध्ये आलेला हा चित्रपट म्हणजे थरार, चित्रपट पाहताना ही प्रेक्षका सुद्धा त्या विचित्र गोष्टीत अडकलेल्या नायकाला बघताना जीव मुठीत घेवून बसतो. विस्मयकारक शेवट आणि संपूर्ण थरार पाहताना मजा येते.

3-  ओपन वॉटर Open Water, 2003

यात स्कुबा डायविंग करणारे एक जोडपं खोल पाण्यात अडकून पडते, आणि काही वेळात आपण शार्क ने घेरलेले आहोत हे कळल्यावर वाचण्याची धडपड पाहताना मजा येते.

4-  अपोलो Apollo 13, 1995

 अपोलो ही space survival प्राकारत येणारी कथा. पाहताना खिळवुन ठेवणारी. अंतराळात अडलेले अंतराळवीर आणि त्यांची स्वतःला वाचवत असताना घडलेल्या गोष्टी पाहण्यात प्रेक्षक हरवून जातो.

5- Gravity, 2013

Graviti हा ही चित्रपट space survival या प्रकरात येतो. या चित्रपटाला अनेक आतंरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहेत. Oascar winning चित्रपट पाहताना नक्कीच मजा येते.

6-  Cast Away, 2000

कास्ट अवे हा चित्रपट नायकाभोती फिरतो. एका डिलिव्हरी ऑफिस चालवत असलेला नायक प्रवासादरम्यान समुद्रात पडतो, नशिबाने वाचून तो किनाऱ्यावर येतो, त्याची तिथे जिवंत राहण्याची कथा खरी रंजक ठरते, त्याच्या सोबतीला असलेला व्हॉलीबॉल त्याचा सोबती होऊन जातो. त्याला सजीव समजून त्याच्याशी गप्पा करणारा नायक आणि त्यांनतर त्याचा परतीचा प्रवास पाहून ही प्रेक्षक खिळून राहतात.

7 –  आफ्टर अर्थ  after arth

आफ्टर अर्थ हा  चित्रपट पाहण्यास फारच रंजक वाटतो, नावाप्रमाणेच पृथ्वीच्या ऱ्हासानंतर दुसऱ्या ग्रहावर आपले नवीन जीवन प्रस्थापित केलेल्या मानवाची ही कथा.. पाहायला फारच रंजक अशी गोष्ट असून एकदा नक्की पहावी.

मराठी मधेही थ्रिलिंग आणि अनपेक्षित शेवटाचे चित्रपट पहायचे असतील तर

  • भयभीत
  • काळ
  • विक्की वेल्लींकर
  • बकाल
  • फक्त 12 तास
  • येरे येरे पैसा

 हे चित्रपट नक्की ट्राय करू शकता.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल