अली फजलने आपल्या लग्नासंदर्भात खूप मोठा खुलासा केला आहे. लॉक डाऊन संपल्यानंतर हे सर्व जग पुर्वरित झाल्यानंतर आम्ही लग्न करणार असे त्याने लाईव्ह सेशन मध्ये सांगितले आहे. ऋचा चढ्ढा आणि अली फजल बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ह्या दोघांचे लग्न आधीच ठरले होते आणि मे मध्ये लग्न होणार आहे अशी माहिती समोर आली होती.
पण मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत त्याने लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे असे सांगितले. त्याच्या मते आम्ही तेव्हाच लग्न करू जेव्हा हे सर्व शांत होईल. सेलिब्रेट करण्यासाठी आमचे काही प्लॅन ठरले आहेत. आम्ही सध्या लॉक डाऊन चे पालन करून आमच्या लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे. जेव्हा सर्व ठीक होईल तेव्हा आम्ही तुम्हाला योग्य ती तारीख कळवू.

अली ने आता पर्यंत २४ सिनेमात काम केले आहेत. ह्यात बॉलीवुड आणि हॉलिवुड चित्रपटांचा समावेश आहे. तीन वेब सिरीजमध्ये सुद्धा त्याने कामे केली आहेत. मिर्झापूर वेबसिरिज मध्ये त्याचे काम खूप लोकांना आवडले होते. तर ऋचा चढ्ढाने आतापर्यंत २५ सिनेमात कामे केली आहेत. दोन वेब सिरीज मध्ये सुद्धा ती आपल्याला दिसली होती.
लोकांना ह्या दोघांची जोडी खूप जास्त आवडत असली तरी काहींना असे वाटते की ऋचा अली पेक्षा वयाने मोठी आहे. पण हे चुकीचे आहे कारण ऋचा अलीपेक्षा एक महिना लहान आहे. अली आपल्या फिटनेस ने आणखी तरुण दिसतो.
ह्या लॉक डाऊन मध्ये ऋचा अली प्रमाणे अनेक असे सेलेब्रिटी आहेत ज्यांची लग्ने थांबली आहेत. पण त्यांनी सुद्धा आपल्या तारखा पुढे ढकलल्या आहेत.