अक्षय कुमार आता मोठ्या उंच शिखरावर पोचला आहे. त्याचा हात कोणीही धरू शकत नाही पण याच्या अगोदर त्याने भरपूर कष्ट घेतले आहेत. मेहनत केली आणि आपला पल्ला गाठला आहे. स्वतच्या हिमतीवर आजपर्यंत तो इथे आहे म्हणून प्रत्येकाने मागे न पाहता मेहनत करायला हवी इतकी की लाजेने सफलता ही आपोआप तुमच्या हातात येईल. आता बॉलिवुड मधील हा खिलाडी सुपरस्टार आहे पण याअगोदर तो ही आपल्यासारखा धकाधकीचे जीवन जगायचा. यांचा जन्म दिल्लीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता अक्षय हा पाहिले मुंबईमधे कुंदनचे दागिने विकायचा तर काही काळ त्याने हॉटेल मध्ये कुक म्हणून ही काम केले आहे. त्यानंतर डायरेक्ट त्याने बँकॉक गाठले फोटोग्राफी केली आणि त्यानंतर त्याचे पदार्पण बॉलिवुड मध्ये झाले.
तर राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी ट्विंकल ही आपल्या बरसात या चित्रपटात प्रसिध्द झाली होती. ट्विंकल खन्नाचे लहानपण बॉलिवुडच्या वातावरणात गेले होते पण अक्षय कुमार हा स्वतच्या हिमतीवर आणि मेहनतीवर स्टार झाला. हा दोघांच्या मध्ये फरक होता. इंटरनॅशनल खिलाडी या चित्रपटाच्या सेटवर या दोघांचे प्रेम प्रकरण जुळले पण याच काळात चित्रपट इंटरनॅशनल खिलाडीच्याच्या सेटवर अक्षय यांचे शिल्पा शेट्टी सोबत जवळीक वाढत चालल्याचे ऐकायला येत होते.
यांचं दरम्यान अक्षय कुमारचा शिल्पा शेट्टी सोबत ब्रेक अप झाले आणि त्यानंतर ट्विंकल सोबतचे त्याचे नाते अजुन घट्ट व्हायला लागले. अशा बातम्या येऊ लागल्या होत्या. 17 जानेवारी 2001 ला दोघांचे लग्न ही झाले तसेच या लग्नासाठी बॉलिवुड मधील फक्त 50 व्यक्तींना बोलाविण्यात आले होते खर तर या नात्यासाठी ट्विंकल च्या घरातील अजिबात मान्य नव्हते कारण अक्षय हा खूप मुलींच्या भावनांशी खेळला आहे असा त्याच्यावर आरोप होता पण ट्विंकलच्या प्रेमापुढे घरातल्यांचेही काहीच चालले नाही तिचे अक्षयवर खूप जास्त प्रेम होते.
त्यानंतर जर लग्न करणार असशील तर तुला हे नाते टिकून ठेवण्याची परवानगी देतो असेल तिच्या वडिलांनी म्हणजे राजेश खन्ना यांनी बजावून सांगितले. त्यानंतर ट्विंकल हिने लग्न झाल्यानंतर बॉलिवुड मधले आपले काम बंद केले आणि त्यानंतर तिने इंटिरियर डेकोरेशन म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पण आता या दोघांचा संसार खूप सुखाचा चाललं आहे आणि असाच चालत राहो त्या दोघांना दोन मुलेही आहेतं. लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर ही या दोघांचे नाते घट्ट टिकून आहे यावरून त्यांच्या नात्यातील प्रेम आपल्याला दिसते.