या दोन मराठी संगीतकार भावांनी चित्रपट सृष्टी
सातासमुद्रापलिकडे नेऊन ठेवली आहे. सध्या तरी या दोन्ही भावांना कोणी ओळखणार नाही असे नाही. या दोघांनी मिळून बरेच सिनेमे केले आहेत त्यातील सैराट,जोगवा, नटरंग,जत्रा, अग बाई अरेच्या,अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये आपले संगीत दिली आहे. त्यांच्या गाण्यांना तोड नसते रसिकांच्या मनावर छाप पाडणारी त्यांची गाणी ऐकायला अत्यंत सुरेल असतात तसेच त्यांनी बॉलिवुड ही गाजवले आहे बॉलिवुड मधील काही सिनेमांना त्यांनी संगीत दिले आहे.

ब्रदर्स, सिंघम, अग्निपथ, धडक,बोल बच्चन, सुपर 30, पानिपत, झुंड हे आहेत त्यांनी बॉलिवुड मध्ये काम केलेले सिनेमे तर त्यांनी फक्त मराठी आणि हिंदी मधेच काम केले नाही तर तेलगू या भाषेतील चित्रपटात ही संगीत दिले आहे. मराठी मध्ये सैराट सिनेमातील गाणी हिट झाली याचे सर्व श्रेय या जोडीला जाते. झिंगाट ह्या गाण्याने तर संपूर्ण जगाला ठेका धरायला लावला.
या दोघांची घोड दौड दिवसेंदिवस वाढत चालली आहे फोर्ब्स 2019 च्या यादीमध्ये सर्वाधिक कमाईचा यादीमध्ये त्यांनी स्थान प्राप्त केले आहे. यामध्ये या दोघांची वार्षिक कमाई 77.71 कोटी इतकी आहे. कमाईच्या कतार मध्ये त्यांनी आपला मराठमोळा सचिन आणि माधुरी या दोघा नंतर अजय अतुल यांनी स्थान पटकावले आहे. तर ऋतिक रोशन, कॅटरिना कैफ,प्रियांका चोप्रा, रोहित शर्मा,अनुष्का शर्मा,आयुष्यमान खुराना, वरून धवन आणि महेश बाबू या तारकांना ही या जोडीने कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे.
त्याचप्रमाणे फोर्ब्स या मासिकाने भारतीय 100 असे सर्वाधिक कमाई करणारे व्यक्ती यांची यादी जाहीर केली आहे. ह्यात पहिल्या स्थानावर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आहे आणि त्यानंतर आहे महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा तसेच सलमान खान,शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांचा नंबर लागतो. शिवाय या यादीमध्ये आपल्या मराठमोली जोडी अजय-अतुल ही बाविसाव्या स्थानावर आहे.