Home संग्रह महाराष्ट्रातील ह्या लेण्या तुम्ही पाहिल्या नाहीत तर तुम्हीही अजुन काहीही पाहिले नाही वाचा कुठे आहेत ह्या लेणी

महाराष्ट्रातील ह्या लेण्या तुम्ही पाहिल्या नाहीत तर तुम्हीही अजुन काहीही पाहिले नाही वाचा कुठे आहेत ह्या लेणी

by Patiljee
922 views

औरंगाबाद जिल्ह्यातले गाव पाषाणातील कोरीव लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे अजंठा आणि वेरूळची लेणी. लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेले अजंठा ठिकाण औरंगाबादपासून १०० कि.मी. ते ११० कि. मी. वर आहे. सुमारे एक हजार वर्षेपर्यंत या ठिकाणी बौद्धांचे एक महत्त्वाचे केंद्र होते असे मानले जाते. ठिकाणी डोंगरांमध्ये खोदलेल्या गुहा आहेत त्यांना अजंठाच्या लेणी म्हणतात. इथे 29 बौद्ध लेण्या आहेत. येथे तयार केलेल्या लेण्या खूप जुन्या आणि ऐतिहासिक तसेच घटनेला अनुसरून अशा आहेत. ह्या लेण्यांची संख्या आपल्याला आता जितकी पाहायला मिळते ती काल क्रमानुसार नाही आहे.

सोयीनुसार यांची मोजणी केली आहे. तुम्हाला माहीत आहे का लेणी नंबर 9 आणि 10 या सगळ्यात जुन्या आहेत त्या बनवण्यासाठी 400 वर्ष इतका मोठा काळ लागला. या लेण्या पैठणी पासून सुमारे 130 किलोमिटर लांब आहेत. पूर्वी काळी मंदिरे, धर्मशाळा आणि लेणी या व्यापाऱ्यांसाठी सुरक्षित आश्रय मिळावा यासाठी उभारण्यात आले आहेत आणि म्हणून असे म्हणतात की अजिंठ्याच्या या लेण्यांची निर्मिती याच उद्देशाने झाली आहे. ही सर्व लेणी वाघूर नदीच्या आसपास विखुरलेली आहेत. 

लेण्यांपैकी १९, २६ व २९ क्रमांकाची लेणी चैत्यगृहे असून १, २, ३, ५, ६, ७, ८, ११, १४, १५, १६, १७, १८, २०, २१, २२, २३, २४, २५, २७ व २८ क्रमांकाची लेणी विहार आहेत. हे विहार मुख्यत्वे भिक्षूंना राहण्यासाठी होते, तर चैत्यगृहे ही पारंपरिक पूजाअर्चेसाठी वापरण्यात येत. कालांतराने विहारांतही मूर्तींची स्थापना झाली.

वेरुळ
महाराष्ट्रातल्या औरंगाबाद शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर वेरूळ हे एक छोटे गांव आहे. येथे प्राचीन काळात कोरलेली १२ बौद्ध, १७ हिंदू आणि ५ जैन अशी एकूण ३४ लेणी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे भोसले घराण्याचे मूळ गाव वेरूळ आहे.

हैदराबादच्या निजाम राजवटीकडे या लेण्यांची मालकी जाईपर्यंत इंदूरच्या होळकरांनी या लेण्यांची काळजी घेतली होती. मात्र इ.स. १९५१ साली भारत सरकारने वेरूळ लेणी हे राष्ट्रीय स्मारक असल्याचे घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे सोपविण्यात आली. ही बौद्ध लेणी विहार स्वरूपाची आहेत.

Source Google

या लेण्या पाहण्यासाठी तुम्हाला ही जायचे आहे तर मग लक्षात घ्या उन्हाळ्याचे एप्रिल, मे आणि जून हे तीन महिने सोडून वर्षातला इतर नऊ महिन्यांचा कालावधी लेण्यांना भेट देण्याकरता चांगला असतो. उन्हाळ्यात त्या परिसराचे खूप उष्ण असल्यामुळे येथे जाणें खूप त्रासदायक ठरू शकते.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल