Home बातमी Airtel Offer तुमच्यासाठी, अशा प्रकारे 2GB फ्री डाटा मिळेल

Airtel Offer तुमच्यासाठी, अशा प्रकारे 2GB फ्री डाटा मिळेल

by Patiljee
1469 views
Airtel Offer

एअरटेल कंपनी नेहमीच्या आपल्या ग्राहकांसाठी काही ना काही नवीन ऑफर आणत असते. पण एअरटेल ग्राहकान पर्यंत अशा ऑफर पोहोचत सुद्धा नाही. पण आज आम्ही तुम्हाला अशीच एक ऑफर सांगणार आहोत. ह्या ऑफर अंतर्गत तुम्हाला 2GB डाटा फ्री मध्ये मिळेल. ही Airtel Offer पुढील एक वर्ष तरी चालणार आहे

एअरटेल ने खाद्य विक्री करणारी कंपनी पेप्सिको सोबत पार्टनरशिप केली आहे. ह्या ऑफर अंतर्गत पेप्सिकोच्या फुड आणि स्नैक खरेदी केल्यानंतर त्या पॅकेटवर एक कूपन कोड मिळेल. त्याद्वारे एअरटेल प्रीपेड कार्ड धारकांना 2GB फ्री मध्ये डेटा मिळेल.

एअरटेल (Airtel) 2GB फ्री डेटा कसा मिळेल?

कंपनीच्या आलेल्या माहितीनुसार लेस चिप्स, कुरकुरे, डॉरित्स अशा पेप्सिकोच्या कोणत्याही ब्रँडची वस्तू खरेदी केल्यास. त्याच्या वस्तूच्या पॅकेटवर एक कोड मिळेल. एअरटेल प्रीपेड ग्राहकांना हा कोड जास्तीच जास्त ३ वेळा वापरता येईल. पण प्रत्येक वेळी कोड वेगळा असणे गरजचे आहे.

Airtel Offer

कोड प्राप्त झाल्यावर तुम्ही एअरटेल थँक्सच्या मदतीने माय कूपन सेक्शन मध्ये जाऊन ह्या कोडचा वापर करू शकता. पण तुम्हाला ही गोष्ट ध्यानात ठेवावी लागेल की प्रत्येक कोड मध्ये फ्री डाटा वेगवेगळा असेल. ही ऑफर एअरटेल आणि पेप्सिको ३ ऑगस्ट ते ३१ जानेवारी २०२१ पर्यंत चालवणार आहेत.

पण ह्यात सुद्धा अनेक अटी असतील ह्याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. जसे जेवढी मोठ्या किंपतीची वस्तू तुम्ही खरेदी कराल तेवढा डाटा मिळेल. मिळालेला डाटा तुम्ही फक्त तीन दिवस वापरू शकता.

जर तुम्ही एअरटेल ग्राहक असाल तर नक्कीच ह्या संधीचा फायदा घ्या.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल