Home संग्रह लखपती व्हायचंय? मग ५ आणि १० रुपयाची नाणी विका आणि श्रीमंत व्हा

लखपती व्हायचंय? मग ५ आणि १० रुपयाची नाणी विका आणि श्रीमंत व्हा

by Patiljee
5053 views

आता पाच आणि दहा रुपयांची नाणि विकून तुम्ही ही लखपती होऊ शकता? बऱ्याचदा जुन्या नाण्यांना मोठी मागणी असलेली दिसते, त्यास कारणही तसेच असे , जुनी नाणी ही दुर्मिळ असल्याने त्यांना त्यांच्या उपयोगात आल्याच्या वर्षारूनच मोठी मागणी असते. अनेक कॉमर्शिअल साईट्स या साठी मोठी किंमत द्यायला तयार असतात , मात्र आता नाणे प्रत्येक लहान मोठ्यांच्या खिशात सर्रास सापडली जाणारी पाच आणि दहा रुपयांची नाणी आता तुम्हाला लखपती बनवू शकतात.

आपल्या कडे कॉमर्सिअल साईट वर जुनी नाणी विक्रीसाठी ठेवले जातात. हौसेला मोल नसते आणि छंद जोपासण्यासाठी उत्साही माणसे वाट्टेल ते करायला तयार असतात, असं म्हणतात गेल्या काही वर्षात दुर्मीळ नाण्यांचे संग्राहक वाढल्याने त्यांना फसविणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. लोकांचा उत्साह आणि त्यांच्याकडील अपुऱ्या ज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना वाट्टेल त्या किमतीला आणि खोटा इतिहास सांगून नाणी विकली जातात. अनेक जानकार आणि शौकीन लोक आपल्या संग्रहात या गोष्टी ठेवण्यासाठी  मोठी किंमत ही देतात, यानेच या नाण्यांना सोन्याची किंमत येते, आणि उद्या तुम्ही याच नाण्यांचा वापर करून लखपती झालात तर नवल नको.. कसे असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो?

सध्या सोसिल मीडिया साईट वर एक viral मॅसेज forword होताना दिसतो आहे, पाच आणि दहा रुपयांची नाणी विकून तुम्ही लखपती होऊ शकता, जर तुमच्याकडे ही अशी नाणी असतील तर ती विकून पैसे कमवू शकता आशा आशयाचा massage व्हाट्सएपच्या माध्यमातून फिरत आहेत.. याबद्दलच काहीशी माहिती जाणून घेऊ. बातमी ऐकून आश्चर्य नक्कीच वाटले असेल मात्र या नाण्यांना बाजारात मागणी आहे. मात्र सर्वच नाण्यांना मागणी नाही. पाच आणि दहा रुपयांचा नाण्यांवर जर वैष्णोदेवी ची प्रतिमा असेल तर या नाण्यांना पाच ते दहा लाखाची किंमत मिळु शकते. लोक या साठी तितके पैसे द्यायला ही तयार होतात. त्यामुळे ज्यांच्याकडे ती आहेत त्यांच्यासाठी शुभ मानली जातात.

देवीचा फोटो असलेली नाणी आपणही जवळ ठेवली तर आपली भरभराट होईल, अशी लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या नाण्यांची किंमत वाढली आहे. त्यामुळे तुमच्याकडेही जर देवीचा फोटो असलेली जुनी नाणी आहेत तर तुम्ही ती इंडियामार्टच्या वेबसाईटवर जाऊन विकू शकता. नाण्यांना विकत घेण्यासाठी लोक या वेबसाईटवर वारंवार सर्च करत आहेत. जगभरात अनेक लोक आहेत ज्यांना जुन्या वस्तूंचा संग्रह करण्याची आवड आहे. इंडियामार्टवर अनेक लोक अशा जुन्या वस्तूंच्या शोधात येत असतात. त्यामुळे तुमच्याकडेही जर जुनी नाणी असतील तर लखपती होण्याची संधी आहे.

पुण्यामध्येही काही दिवसांपूर्वी झालेल्या एका दुर्मिळ नाण्यांच्या प्रदर्शनात एका नाण्याला

या प्रदर्शनामध्ये एका दुर्मीळ नाण्यांचा लिलाव झाला. यामध्ये ऐतिहासिक संदर्भ, ब्रिटिश इंडिया, मुघल साम्राज्यातील, इंडो पोर्तुगीज अशी विविध ‌प्रकारातील नाणी, टोकन, मेडल आणि वस्तूंचा समावेश होता. या लिलावाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वाधिक चर्चा झाली ती ‘झोडिअॅकल लिओ रुपी’ या नाण्याची. प्रत्यक्षात आपण जेव्हा या या नाण्यांचा लिलाव होत होता तेव्हा एवढी किम्मत नक्कीच अपेक्षित नव्हती, पण त्याच्या दुर्मिळते मुळे नाण्याला एवढी किंमत मिळाली.

मुघल साम्राज्याच्या प्रतीकामध्ये सिंह आणि सूर्याला विशेष महत्त्व होते. या नाण्यामध्येदेखील तेजोमय सूर्य आणि त्यापुढे अंगावर तारे असलेला सूर्य साकारण्यात आला होता. त्यामुळे अनेक अर्थाने वेगळेपण जपलेल्या या नाण्याला लिलावात उठाव मिळाला. बादशहा जहाँगीरने अहमदाबादमध्ये राशीनुसार चांदीची नाणी करून घेतली होती. इराणी ज्योतिषशास्त्रानुसार बादशाची सिंह रास असल्याने त्यासाठी सिंह राशीची नाणी विशेष आवडती होती. पण या नाण्याची गुणवत्ता आणि त्यातील बारकाव्यांमुळे त्याला अधिक किंमत मिळाली. बादशहा जहाँगीरने हे नाणे बनवून घेतले होते. ते चांदीमध्ये बनविण्यात आले असून त्यावर सिंह आणि सूर्याचे रेखीव चित्र आहे. पुण्यातील या लिलावामध्ये सर्वाधिक किंमत या नाण्याला मिळाली.

मुंबईतील टकसाळात बनविण्यात आलेल्या नाण्यांच्या लिलावामध्ये विशेष मागणी असल्याचेही पुढे आले आहे. मुंबईत ।बनविण्यात आलेल्या नाण्यांवर डायमंडची एक निशाणी असते. तुमच्याकडेही अशी नाणी असल्यास त्यास अनेक खरेदीदार मिळू शकतात. त्याच बरोबर  एक रुपयांच्या नाण्याला ही तीन लाखाची  किंमत मिळाली होती. जुनी आणि वैशिष्ठ्यपूर्ण नाणी जमविण्याचा अनेकांना छंद असतो आणि ही मंडळी जुन्या नाण्यांसाठी कितीही पैसे मोजायला तयार असतात याचा अनुभव पुन्हा एकदा आला आहे. आंध्रात तेलगु कॉन्फरन्स सुरू असताना तेथे लावलेल्या स्टॉलवर १ रूपयाचे जुने नाणे म्हणजे १९७३ सालचे नाणे चक्क ३ लाख रूपयांना विकले गेले आहे. १९७३ साली मुंबई टांकसाळीत हे नाणे पाडले गेले होते. ही टांकसाळ देशातील जुन्या टांकसाळीपैकी एक असून ती ब्रिटीशानी सुरू केली होती. या टांकसाळीतील नाण्यांवर डायमंड शेपचा डॉट दिलेला असतो.

नाणे विक्री करणार असाल तर …

एका दुकानात किंवा ज्वेलरीच्या दुकानमध्ये जाऊ नका जे मोठ्या “आम्ही सोने आणि चांदी विकत घेतो” याव्यतिरिक्त, हॉटेल किंवा इतर तात्पुरते स्थानावर सेट केलेल्या व्यवसायात जात नाही शेवटी, नाणे शो किंवा डीलरकडे जाऊ नका कारण ठिकाणी जाताना आपल्याला आपल्या हातातल्या गोष्टींच्या किमतीची पूर्णपणे जाणीव नसते.  आपल्या जवळ एक स्थानिक नाणे डीलर शोधण्याची वेळ येते तेव्हा, . आपण त्याला काही गोष्टी शिकण्यासाठी काही नाणी दर्शवणार असला तरीही, ते किती किमतीचे आहेत हे शोधून काढतात किंवा काही नाणी विकतात.

आपण एखाद्या तज्ञांच्या डीलरशी सल्लामसलत करत आहात हे निश्चित करण्यासाठी तसेच आपण ज्या व्यवहारास गेला आहात ते एक प्रामाणिक आणि नैतिक नाणे डीलर आहे याची खात्री करा, आपण प्रथम व्यावसायिक न्यूमेटाटिस्ट्स गिल्ड (पीएनजी) डायरेक्टरीशी चर्चा करावी. कधी या विषयात आपल्या हातात आलेल्या नाण्यांचा इतिहास आपल्याला जुना दिसत असला तरी नकला केलेले अनेक वेळा लक्षात येते. कारण या प्रकारच्या नाण्यांना बाजारात मोठी मागणी आहे, यात लाखोंनी पैसे कमावता येत आसल्याने त्याचा गैरवापर केला जातो, हुबेहूब नाणे बनवून बाजारात उपलब्ध करून दिली जातात.

बनावटीच्या नाण्यांची कला आणि फसवणूक जवळपास अस्तित्वात होती कारण प्राचीन कारागीरांनी प्रथम 600BC मध्ये नाणी काढली होती. मूलतः, व्यापारी आणि नागरिकांना फसवणूक करण्याच्या हेतूने लोकांनी  नकला केल्या . आधुनिक काळामध्ये, बनावटीचे नाणे सिक्का कलेक्टर्सला फसविण्यासाठी बनावट नाणी करतात. एकतर, एक नकली किंमती कमी किंमतीच्या साहित्याचा वापर करून आणि ते अधिक मौल्यवान वाटणारी काहीतरी बनवून पैसे कमावतात. आपण एक नाणे बनावट असू शकते असे आपल्याला वाटत असल्यास, आपण खरेदी करण्यापूर्वी दुसरे मत विचारात घ्या.

प्रत्यक्षात अशी नाणी त्या काळी बनवली गेली नाहीत. दुय्यम दर्जाचे मेटल वापरातून हुबेहूब जुनी नाणीही बाजारात दिसतात. अनेकदा एखाद्या दुर्मीळ नाण्याला लिलावात लाखात किंमत मिळाली की लगेच फसवेगिरी करणारी मंडळी त्यांच्याकडील नाण्यांच्या किमती वाढवतात. त्यामुळे संग्राहकांनी जुनी नाणी घेताना जागरुक राहावे. आणि विकणाऱ्यांनी ही..मुंबई विद्यापीठाने कालिना संकुलात असलेल्या दिनेश मोदी नाणे संग्रहालय आणि नाणेशास्त्र संस्थेत नाण्यांचा अभ्यास करण्यासाठी ‘नाणेशास्त्र’ विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला आहे.   

 नाणे कुठे तयार करण्यात आले ते समजण्यासाठी सर्व प्रकारच्या नाण्यांवर एक छोटी खूण (मिंट मार्क) करण्यात येते. अशी खूण पाहून नाणी जमा करणे हा या छंदातला एक महत्त्वाचा भाग समजला जातो. एक म्हणजे आपल्याकडे अशीच काहीशी दुर्मिळ गोष्ट असेल  आणि योग्य किमतीचा अंदाज नसेल तर त्याचा योग्य तो अभ्यास करून काय तो निर्णय घेणे उत्तम..

ब्रिटिशकालीन नाण्यांना भारीच किंमत मिळत होती..

१९३९ मधील नाण्यांना प्रचंड किंमत येते असे दिसल्यावर या नाण्यांची बनावट नाणी तयार झाली आहेत १९३९ मधील ब्रिटिशकालीन बनावट नाणी कोणीतरी घडवण्याचा व्यवसाय केला. ही नाणी बाजारात विक्रीसाठी आली. पण नाण्यांची पारख करणारी मंडळी ही बनावट नाणी बरोबर शोधून काढतात. त्यावर इंग्रजीमध्ये लिहिलेल्या RUPEE मधील Uवरून बनावट नाणे ओखळले जाते. बनावट नाण्यांवरील U अर्धातुटका आहे. U पूर्ण नसेल म्हणजे वर पूर्ण झालेला नसेल तर ते नाणे बनावट आहे म्हणून समजावे. हा सूक्ष्म फरक साध्या डोळ्यांनी दिसत नाही. डोळ्याला भिंग लावून त्यातील बारकावे तपासून घ्यावे लागतात.  हे एवढ्यावरच थांबत नाही तर आणखीही गोष्टी यात येतात.

  • नाणे संग्रह करण्यासाठी नाणे विकत घेत असाल तर

कुठेतरी गुप्तधन मिळाले असे सांगून प्रचार केला जातो, गिर्हाईकांना खरे वाटावे म्हणून त्यांना खोटी सोन्याची चांदीची नाणी दाखवून अमिश दाखवले जाते अनके लोक याला भुलतात देखील, प्रत्यक्षात त्यांना कुठेतरी बोलवून लूट केली जाते, बहुतेकदा पारराज्यात बोलावले जाते मात्र प्रत्यक्षात हातात काहीही मिळत नाही.. घेणाऱ्याची ही अवस्था .  हेचनाही तर तुम्ही विकत घेण्यासाठी उत्सुक असाल तर आपल्या अभ्यास अभावी आपल्याला त्याच्या खऱ्या इतिहासाची कल्पना नसते यातच आपली फसवणूक ही केली जाते.. त्याच जागी काही बनावटी इतिहास बनवून बनावटी पुरावे सुद्धा दाखवले जातात.

गोष्टी या प्रकार पर्यंत च थांबत नाही तर  आपल्याकडचे नाणे किव्वा वस्तू खरंच तेवढी दुर्मिळ असल्यास त्यावर किती किंमत मिळेल हे आपल्याला माहीत नसल्याने सारर्स आपल्याला याची काहीच किंमत नाही असे सांगून फार कमी किमतीत घेतले जाते.. लोकांची फसवणूक करणारी तांत्रिक-मांत्रिक मंडळी ठराविकच नाणे घेऊन या असे सांगतात. इंदिरा गांधीची छबी असलेले एक रुपयाचे नाणे घेऊन या किंवा बाबासाहेब आंबेडकर यांची छबी असलेले दोन रुपयांचे नाणे घेऊन या असे सांगतात. वास्तिवक अशी नाणी टाकसाळीने घडवलेलीच नाहीत पण कोणी तरी अशी बनावट नाणी तयार केलेली आहेत.

तांत्रिक-मांत्रिक मंडळी अशी नाणी घेऊन या असे सांगतात. मग ही बनावट नाणी तीस ते पस्तीस हजार रुपयांना कुठून तरी विकत घेऊन येतात. गुप्तधन तर मिळत नाहीच पण हे खोटे नाणे च्या नावाखाली त्यांचा धंदा मात्र वाढवतात. तंत्रज्ञान पुढे गेलेलं असल्याने अनेक बनावट साईट वैगरे उघडून ही या नाण्यांचा बनावट बाजार केला जातो, लोकांकडून कमीत कमी किमतीत घेवून दुरीसरीकडे त्याचे लाखांमध्ये पैसे घेत असलेले दिसतात..

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल