तमिळ अभिनेता नितीन आपल्या सुंदर चेहऱ्यामुळे नेहमीच अनेक मुलींच्या गळ्यातले ताईत बनला आहे. २००२ मध्ये जयम ह्या सिनेमातून त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. ह्याच सिनेमात अभिनेता गोपीचंद ह्याने खलनायकाची भूमिका साकारली होती.
ह्या सिनेमानंतर २००३ मध्ये त्याने दिल, संबरम, श्री अंजनेयम अशा तीन सिनेमात काम केले. ह्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. एक चॉकलेट हिरो म्हणून तो तमिळ सिनेसृष्टीत आपले स्थान निर्माण केले. आपल्या ह्या कारकिर्दीत त्याने आता पर्यंत ५० सिनेमात काम केलं आहे.
सध्या नितीन आपल्या मॅरेजमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. शालिनी सोबत तो आपल्या आयुष्याची डोर बांधणार आहे. ह्या दोघांचा साखरपुडा फेब्रुवारी महिन्यातच झाला होता. लग्न एप्रिल महिन्यात होत पण लॉक डाऊन मुळे लग्न पुढे ढकलण्यात आले.

पण आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे नितीन आणि शालिनी हैदराबाद मध्ये २६ जुलै रोजी लग्न करणार आहेत. योग्य सुरक्षितता घेऊन हे लग्न पार होईल असे सुद्धा सांगण्यात आले आहे. अनेक अभिनेते, नेते आणि निकटवर्तीयाना आमंत्रण दिलं आहे.
शालिनी आणि नितीन एकमेकांना मागील ८ वर्षापासून ओळखत आहेत. अनेक वर्ष रिलेशनमध्ये असल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. शालिनी ने यूके मधील विश्व विद्यालयात Management चे शिक्षण घेतले आहे.
हे पण वाचा अभिनेत्री अर्चना निपाणकर अडकली विवाहबंधनात, पहा कोण आहे तिच्या आयुष्याचा जोडीदार